माध्यम संशोधन संवाद-logo

माध्यम संशोधन संवाद

Education Podcasts

Dialogue in Marathi with media students about the why and how of media research.

Location:

United States

Description:

Dialogue in Marathi with media students about the why and how of media research.

Language:

English


Episodes
Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

व्यष्टी अध्ययन (केस स्टडी)

6/10/2021
केस स्टडी ही पद्धत वैद्यकीय, व्यवस्थापन या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणाच वापरली जाते. परंतु माध्यम अभ्यासातदेखील तिचा मोठा उपयोग होऊ शकतो. केस स्टडी म्हणजे काय, कोणत्या प्रकारच्या विषयांसाठी ही पद्धत अधिक उपयुक्त आहे त्याची चर्चा या भागात केली आहे.

Duración:00:15:10

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

क्षेत्रीय निरीक्षण

5/30/2021
माध्यम संशोधनात आशय निर्मितीप्रक्रिया, तिचे विविध घटक, त्यांतील परस्परसंबंध समजून घेणे याला विशेष महत्त्व आहे. तसेच आशय आस्वाद पद्धती कोणकोणत्या असतात, त्यांवर आस्वादक कसे व्यक्त होतात याचाही वेध घेणे माध्यम संशोधकांना महत्त्वाचे वाटते. त्यासाठी क्षेत्रीय निरीक्षण ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. त्याविषयी या भागात जाणून घेऊयात.

Duración:00:20:13

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

विषयकेंद्री गटचर्चा

5/21/2021
गुणात्मक संशोधनपद्धतींच्या अंतर्गत विषयकेंद्री गटचर्चा (फोकस ग्रुप डिस्कशन) हीदेखील माध्यम संशोधनात अनेकदा वापरली जाणारी पद्धत आहे. विशेषतः आस्वादकांची माध्यमआशयासंबंधीची मते आणि त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तिचा उत्तम उपयोग केला जाऊ शकतो.

Duración:00:20:26

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

सखोल किंवा प्रदीर्घ मुलाखती

5/14/2021
अनेक संशोधनांमध्ये सखोल मुलाखतींद्वारे तथ्य संकलन केलेले आढळते. त्याचे कारण असे की गुणात्मक संशोधन पद्धतीमुळे मिळणाऱ्या लवचिकतेचा उत्तम उपयोग करून विषयाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्तींकडून थोड्या काळात खूप जास्त संकलन करता येते. मात्र ऐकताना वाटते तेवढी ती पद्धत सोपी नाही. शास्त्रीय संशोधन पद्धत म्हणून मुलाखती घेताना कोणती काळजी घ्यायची, त्याद्वारे तथ्यसंकलन कसे करायचे ते या भागात सविस्तर, व नेहमीप्रमाणे सोदाहरण सांगितले आहे.

Duración:00:22:16

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

गुणात्मक संशोधन पद्धती- स्वरूप, उपयोग, प्रकार इ.

5/7/2021
संख्यात्मक संशोधनपद्धती किंवा तथ्य संकलन पद्धती पाहिल्यानंतर आता गुणात्मक पद्धतींचा परिचय आपण करून घेणार आहोत. गुणात्मक पद्धती कधी वापराव्या, त्या पद्धतींचा कसा उपयोग करून घ्यावा, त्यांची वैशिष्ट्ये काय या मूलभूत मुद्द्यांची चर्चा या भागात केली आहे. तसेच प्रमुख चार प्रकारही सांगितले आहेत. त्यांपैकी एकेका प्रकाराची सविस्तर चर्चा यापुढील भागांमध्ये आपण करणार आहोत.

Duración:00:19:02

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

प्रायोगिक संशोधन

4/30/2021
संख्यात्मक तथ्य संकलन पद्धतीतील प्रायोगिक संशोधन ही महत्त्वाची पद्धत आहे. उपयोजित संशोधनासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते, कारण त्यातून विविध घटकांमधील कार्यकारण संबंध शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध करता येऊ शकतो. माध्यम संशोधक सर्वेक्षण किंवा आशय विश्लेषण यांच्याइतकी ही पद्धत वापरत नसले तरी तिचा वापर होणे का आवश्यक आहे, व तो कसा करायचा ते या भागात सांगितले आहे.

Duración:00:21:07

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

आशय विश्लेषण (भाग ३)- सोदाहरण विवेचन

4/23/2021
या भागात दोन उदाहरणे दिली आहेत. एक आहे एका महाकाय आंतरराष्ट्रीय अभ्यासाचं. दुसरं आहे एका छोट्या काल्पनिक अभ्यासाचं. आशय विश्लेषणाच्या सर्व पायऱ्या समजायला त्यातून मदत होईल. विश्लेषणाची चले, त्यांची वर्गवारी, संकेतनाची पद्धत अशा अनेक संकल्पनांचा परिचय या भागात होईल. ज्या अभ्यासाचे उदाहरण घेतले आहे त्याचा दुवा देत आहे. http://europeanelectionstudies.net/wp-content/uploads/2012/06/codebook-contextual.pdf

Duración:00:22:25

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

आशय विश्लेषण (भाग २)- एकक, नमुना कालावधी इ.

4/16/2021
आशय म्हणजे काय? फक्त विचार, की भाषा की रूपबंध, सादरीकरणाची पद्धती? या आणि अशा इतर प्रश्नांची उत्तरे या भागात मिळतील. त्याचबरोबर आशय विश्लेषणाचे एकक कसे ठरवायचे, नमुना प्रातिनिधिक व्हावा यासाठी नमुन्याच्या आकाराइतकाच कालावधीचा विचार करणे का आवश्यक आहे ते या भागात सांगितले आहे. नेहमीप्रमाणे प्रत्येक मुद्द्याची उदाहरणेदेखील दिली आहेत.

Duración:00:20:51

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

आशय विश्लेषणः परिचय व विविध उपयोग

4/9/2021
आशय हा माध्यम व्ययवहाराचा आत्मा आहे. त्यामुळे अर्थातच माध्यमांच्या आशयाचे विश्लेषण हा माध्यम संशोधनाचा महत्त्वाचा घटक आहे. संख्यात्मक पद्धतीशास्त्राच्या अंतर्गत सर्वेक्षणाएवढीच वापरली जाणारी संख्यात्मक तथ्य संकलन पद्धती म्हणजे आशय विश्लेषण. माध्यम व्यवहार समजून घेण्यासाठी आशय विश्लेषणाचा विविध प्रकारे कसा उत्तम उपयोग होऊ शकतो ते या भागात सांगितले आहे.

Duración:00:20:31

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

प्रश्नावलीः विविध मापनश्रेणी व त्यांचे महत्त्व

4/5/2021
प्रश्नावलीसंबंधीच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात प्रतिसादकांची मते, प्राधान्य, मूल्यमापन इ. जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरता येतात ते सांगितलं आहे. Likert Scale, Sematic Differential Scale, Linear Numeric Scale अशा साधनांची अगदी सोप्या शब्दांत ओळख करून दिली आहे. या श्रेणी कशा पद्धतीने वापरता येतात ते सोदाहरण स्पष्ट केलं आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटते का, आणखी कोणत्या विषयांचा कशा पद्धतीने या पॉडकास्टमध्ये समावेश झालेला तुम्हाला आवडेल त्याविषयी ujjwalabarve@gmail.com या पत्त्यावर जरूर कळवा.

Duración:00:21:03

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

प्रश्नावली- प्रश्नांचे स्वरूप, शब्दांकन, क्रम इ..

3/30/2021
प्रश्नावली हे साधन विकसित करणे कौशल्याचे काम आहे. त्यातील प्रत्येक बाबीचा काळजीपूर्क विचार केला तर उत्तम प्रश्नावली बनवता येते, व त्यामुळे तथ्यसंकलन उत्तम होऊ शकते. प्रश्नावली तयार करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावेत, कोणते प्रश्न विचारावेत, कोणते विचारू नयेत, प्रश्नांचा क्रम काय असावा, ते कसे लिहावेत या मुद्द्यांची सोदाहरण चर्चा या भागात केली आहे.

Duración:00:22:47

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

प्रश्नावली- घटक, स्वरूप, व मांडणी

3/27/2021
प्रश्नावली जितकी चांगली असेल तितके सर्वेक्षण चांगले होऊ शकते. संशोधनाचा विषय कोणताही असला तरी प्रश्नवाली तयार करण्याचे काही मूलभूत नियम, पद्धती समान असतात. या भागात त्या मूलभूत संकेतांची चर्चा करण्यात आली आहे. प्रश्नावलीतील प्रश्नांचे शब्दांकन कसे असावे, प्रश्न विचारण्याच्या पद्धती कोणत्या ते यापुढील भागांत पाहणार आहोत.

Duración:00:22:11

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

संख्यात्मक संशोधन पद्धती- सर्वेक्षण

3/22/2021
सर्वेक्षण ही संख्यात्मक संशोधनपद्धती माध्यम संशोधनात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, कारण माध्यमांच्या ग्रहणकर्त्यांकडून उपयुक्त माहिती त्याद्वारे मिळवता येते. सर्वेक्षण कस करावे, त्यातील महत्त्वाच्या पायऱ्या, सर्वेक्षण करण्याचे वेगवेगळे मार्ग, त्यांचे फायदेतोटे या मुद्द्यांची चर्चा या भागात केली आहे.

Duración:00:20:44

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन- परिचय

3/5/2021
इंग्रजीत Research methodology Research Method अशा दोन भिन्न संज्ञा प्रचलित आहेत. मराठीतही तो फरक करणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे विवेचन या भागात केले आहे. तसेच माध्यमांच्या संदर्भात संख्यात्मक व गुणात्मक संशोधन म्हणजे काय, ते कसे केले जाते, त्यांत फरक काय आहेत, तेही या भागात ऐकायला मिळेल. Roger D. Wimmer व Joseph R. Dominick यांच्या Mass Media Research या पुस्तकाचा त्यासाठी आधार घेतला आहे. तुमचा अभिप्राय व सूचना ujjwalabarve@gmail.com या पत्त्यावर जरूर कळवा.

Duración:00:20:01

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

संशोधन आराखडा

2/26/2021
योग्य नियोजन नसेल तर कोणतेही काम अयशस्वी होण्याची शक्यता वाढते. संशोधनप्रक्रियेच्या बाबतीत तर ते अगदीच खरे आहे. संशोधन ही विचारपूर्वक, शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची गोष्ट असल्याने त्यातील प्रत्येक बाबीचा सांगोपांग विचार होणे आवश्यक आहे. आधी वाचलेले संशोधन अहवाल आणि संशोधनपद्धती, नमुना निवड पद्धती, अभ्यासविषय यांचे ज्ञान यांच्या आधारे संशोधनाची आखणी करणे आवश्यक असते. ही आखणी करणे म्हणजेच संशोधनाचा आराखडा तयार करणे. तो का करावा, कसा करावा, कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यात विचार करवा या प्रश्नांची उत्तरे या भागात मिळतील.

Duración:00:20:30

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

सैद्धांतिक चौकट (Theoretical Framework)

2/18/2021
कोणतेही शास्त्रीय संशोधन पूर्णतः नवीन, स्वतंत्र असत नाही. आपल्या संशोधनविषयाशी प्रचलित सिदधांत उपलब्ध असू शकतात, किंबहुना असतातच. अशा सिद्धांतांचा शोध घेऊन त्यांच्या आधारे आपल्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, रूपरेषा आणि व्याप्ती ठरवणे, अभ्यासाची चौकट आखून घेणे महत्त्वाचे आहे. ते ठरवणे हा संशोधनप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. सैद्धांतिक चौकट ठरवणे म्हणजे त्या सिद्धांताचा पुरस्कार करणे नव्हे. तर दिशादर्शनासाठी त्याचा वापर केला जातो. संशोधनाच्या अंती त्या सिद्धांताला पुष्टी मिळू शकते किंवा त्याचा प्रतिवादही केला जाऊ शकतो. सैद्धांतिक चौकटीचे महत्त्व पटले तरी संज्ञापनाविषयीचे सिद्धांत माहीत नसणे हा एक मोठा अडसर ठरू शकतो. त्यासाठी https://www.communicationtheory.org/ या संकतस्थळावरील यादीचा उपयोग होऊ शकतो. मात्र त्यावर दिलेल्या सिद्धांतांविषयी अधिक सखोल वाचन करणे आवश्यक आहे. डेनिस मॅक्वेल यांचे ‘मास कम्युनिकेशन थिअरी’ हे पुस्तकदेखील उपयुक्त आहे. स्टीफन लिटलजॉन व केरेन फॉस यांनी संपादित केलेला ‘एनसायक्लोपीडिया ऑफ कम्युनिकेशन थिअरी’ हा दोन खंडांचा कोशही चांगला संदर्भस्रोत आहे. काही सूचना, शंका असल्यास जरूर ujjwalabarve@gmail.com या इमेल पत्त्यावर संपर्क करा.

Duración:00:19:41

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

पूर्व साहित्याचा आढावा

2/12/2021
आपला संशोधनविषय अगदी जगावेगळा आहे, त्यासंबंधी काहीही संशोधन याआधी झालेलं नाही असं मानणं ही संशोधनाच्या प्रक्रियेतली सगळ्यांत मोठी चूक ठरू शकते. आपल्या विषयासंबंधी आधी झालेल्या संशोधनांचा शोध कसा घ्यावा, त्यातून काय निवडावं, ते संशोधन अहवाल कसे वाचावे, त्या वाचनाचा, त्यांच्या चिकित्सक समीक्षेचा काय उपयोग होतो हे या भागात सांगितलं आहे. संशोधन पद्धती कशी ठरवली, गृहीतकं कशी मांडली, संशोधन प्रश्न कशाच्या आधारे ठरवले, समर्पक सैद्धांतिक चौकट कशी निश्चित केली या आणि अशा अनेक कळीच्या प्रश्नांची अचूक उत्तरं संशोधकाला योग्य प्रकारे घेतलेल्या पूर्वसाहित्याच्या आढाव्यातूनच मिळू शकतात. म्हणूनच संशोधनप्रक्रियेतील हा टप्पा व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे.

Duración:00:19:50

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

संदर्भ स्रोतः महत्त्व आणि निर्देश

2/5/2021
संशोधनाच्या प्रक्रियेत विविध संदर्भ वापरून आपल्या संकल्पना समजून घेणे, अभ्यासविषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणे, आकडेवारी माहीत करून घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी विविध संदर्भस्रोत उपलब्ध असतात, व ते मोठ्या प्रमाणावर वापरावे लागतात. संशोधन अहवाल लेखनातही ती सर्व माहिती, व्याख्या, सिद्धान्त इ.चा उल्लेख करावा लागतो. ते करत असताना संदर्भस्रोताचा निर्देश करणे आवश्यक असते. त्याच्याही विविध पद्धती ठरलेल्या असतात. संदर्भस्रोतांचे महत्त्व, अहवालात त्यांचा निर्देश का आणि कसा करावा हा या भागातील संवादाचा विषय आहे. एपीए संदर्भनिर्देशन पद्धतीची सविस्तर माहिती https://apastyle.apa.org/style-grammar-guidelines/references/examples येथे मिळेल. तुमच्या सूचना, मते इ. पाठवण्यासाठीचा माझा पत्ताः ujjwalabarve@gmail.com

Duración:00:24:04

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

विविध विद्यापीठांत झालेल्या संशोधनांचे विषय आणि शीर्षके

1/29/2021
या भागात काही संशोधकांच्या अभ्यासांची उदाहरणे देऊन कशा प्रकारचे विषय संशोधनासाठी घेता येतात, संशोधन अभ्यासांची शीर्षके काय असतात हे स्पष्ट केले आहे. संशोधनाची व्याप्ती निश्चित करणे, आणि ती शीर्षकांतून स्पष्ट करणे का अवश्यक आहे तेदेखील यात सांगितले आहे. तुमच्या सूचना ujjwalabarve@gmail.com या पत्त्यावर जरूर कळवा.

Duración:00:18:17

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

माध्यम संशोधनाचा विषय कसा असावा आणि तो कसा सुचतो?

1/22/2021
माध्यम संशोधनाच्या प्रक्रियेची सुरुवात चांगला विषय ठरवण्यापासून होते. परंतु हा टप्पा वाटतो तितका सोपा नाही. आपला विषय योग्य आहे हे ठरवण्यासाठी कोणत्या कसोट्या आहेत ते या भागात जाणून घेऊयात. चांगले विषय कसे सुचतात तेही या भागात कळेल.

Duración:00:21:14