Sports कट्टा-logo

Sports कट्टा

Sports & Recreation Podcasts

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Location:

India

Description:

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Twitter:

@audiowallah

Language:

English


Episodes
Ask host to enable sharing for playback control

Samson, Chahal, Kohli, Dube included; no place for Rahul, Ruturaj for T20 World Cup

4/30/2024
The suspense over India's squad for the T20 World Cup 2024 is finally over, with the 15-member team and four standbys having been announced on April 30. Do you think this squad has the wherewithal to end India's cricket team's prolonged drought for a World title? Here's our take, thanks to Amol Gokhale and Amol Gokhale, The Hindu's seasoned sports journalist.

Duration:00:28:42

Ask host to enable sharing for playback control

The Curious Case of Delhi Cricket, ft Vijay Lokapally

4/28/2024
The curious case of Delhi & District Cricket Association (DDCA). The DDCA is frequently in the news for the wrong reasons rather than the right ones. However, DDCA has nurtured some generational talents, who have gone on to represent Indian cricket at the highest level. The culture of Delhi Cricket is something as revered as Mumbai Cricket. Virender Sehwag, Ashish Nehra, Virat Kohli, Ishant Sharma and Rishabh Pant are some of the contemporary gems produced by Delhi. Why there's such an aura of Delhi cricket? Vijay Lokapally, a veteran sports journalist, who has worked for over four decades in Delhi, sheds light on the good, the bad and the ugly side of DDCA in this candid unmissable conversation with Amol Karhadkar, sports journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa... दिल्ली क्रिकेट बऱ्याचदा नकोश्या कारणांमुळे किंवा संघटनेतल्या राजकीय हस्तक्षेपामुळे चर्चेत येतं. पण DDCAची (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना) हि एक बाजू झाली. दिल्लीने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले जे जगज्जेते ठरले. फक्त आजच्या काळातील खेळाडू बघितले तर वीरेंदर सेहवाग, आशिष नेहरा, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि रिषभ पंतसारखी नावं सहजी डोळ्यासमोर येतात. हि झाली दिल्ली क्रिकेटची दुसरी बाजू... पण दिल्ली क्रिकेटची काही बातच न्यारी आहे, असं भारतातल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीला का वाटतं? जेष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली ज्यांनी चार दशकांहून अधिक दिल्लीमध्ये क्रीडापत्रकारिता केली आहे त्यांनी दिल्ली क्रिकेटच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. बिशन सिंह बेदींनी एक पिढी कशी 'तय्यार' केली, रमण लांबा सांगून शतक कसं ठोकायचा ते IPL २०२४ मध्ये सनसनाटी कामगिरी करणाऱ्या मयांक यादवकडून फी घेऊ नका हे दिवंगत प्रशिक्षक तारक सिन्हा का म्हटले? ह्या आणि अश्या विषयांवर त्यांनी दिलखुलास कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

Duration:00:49:39

Ask host to enable sharing for playback control

India's T20 World Cup squad: Rahul or Samson? Rinku or Dube?

4/27/2024
The selection committee meeting for Team India’s World Cup squad is always up for a huge debate. The deadline to submit the preliminary squad is May 1 and the team news could be out anytime soon. Only a handful of players are certain of their berth in the World Cup squad, but there could be some jostling for remaining positions. Against that backdrop, Sports Katta organised a selection committee meeting convened and chaired by Team Sports Katta member Amol Gokhale. Members of the selection committee are - Aditya Joshi, team Sports Katta; Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu and Shardul Kadam, Amuk Tamuk Podcast Network. The committee has selected the 15 that they believe can win the T20 World Cup for India. As far as the fans are concerned, one lucky fan will get a souvenir (Amuk Tamuk Tee) if you predict the correct 15-member World Cup squad… भारतीय संघाची निवड समितीची बैठक ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तो संघ जर वर्ल्ड कपसाठीचा असेल तर त्यावर फारच उहापोह होतो. कुठलेही १५ निवडले तरी ही नावं का घेतली आणि ही नावं का घेतली नाहीत, अशी टोकाची भूमिका घेतलीच जाते. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात होणाऱ्या T२० विश्वचषकासाठी काही नावांची रस्सीखेच नक्कीच होणार आहे आणि मग कुठले १५ खेळाडू घेऊन जायचे हे ठरवताना निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर ह्यांचा नक्कीच कस लागणार आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून स्पोर्ट्स कट्टाने एक वादळी बैठक घेतली. बैठकीचा समन्वयक टीम स्पोर्ट्स कट्टाचा सदस्य अमोल गोखले होता आणि बैठकीत सामील झाले होते टीम स्पोर्ट्स कट्टाचा अजून एक सदस्य आदित्य जोशी, द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर आणि अमुक तमुक पॉडकास्ट नेटवर्कचा शार्दूल कदम... हा एपिसोड निवडसमितीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त फिरवा. तुमचा वर्ल्ड कपचा संघ अचूक ओळखा आणि एका भाग्यवान विजेत्याला अमुक तमुकचा टी-शर्ट भेट मिळेल...

Duration:00:36:18

Ask host to enable sharing for playback control

What's in a name? Ask Sachin Dhas

4/20/2024
Sanjay Dhas knew that if he were blessed with a baby boy, he would name him after legendary India batter Sachin Tendulkar. He did name his son - Sachin. He probably had foreseen that Sachin Dhas would become a cricketer as well. Sachin remembers playing with only bat and ball, nothing else. He started playing cricket at four and played his first invitation match at six. Coming from a small village like Beed, he rose through the ranks of age-group cricket in Maharashtra. With his unmistakable talent, he was named in the India squad for the U-19 World Cup. India lost the World Cup final to Australia but Sachin was one of the standout performers of the tournament. In this candid conversation on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale, Sachin talks about his cricketing journey, representing India at the Under-19 level, dealing with the disappointment of a World Cup final loss and making his Ranji Trophy debut for Maharashtra almost immediately along with life and cricket in Beed... संजय धस यांनी आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव सचिन तेंडुलकरकरच्या नावावरुन 'सचिन' ठेवायचं हे ठरवून ठेवलं होतं. तो क्रिकेटपटू होईल हे देखील त्यांनी योजलं असावं. सचिन धसला फक्त बॅट-बॉल खेळल्याचंच आठवतं. वयाच्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला लागून सचिन सहाव्या वर्षी पहिल्यांदा 'निमंत्रित क्रिकेट' देखील खेळला होता. त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर धावांचा रतीब घालत तो महाराष्ट्रासाठी विविध वयोगट स्पर्धांत खेळला. २०२४ मध्ये झालेल्या १९-वर्षाखालील विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला पण दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत सचिनने केलेल्या कामगिरीचं कौतुक झालं. बीडसारख्या छोट्या गावातलं आयुष्य आणि क्रिकेट कसं आहे? भारतासाठी खेळण्याची भावना काय असते? एका मोठ्या अंतिम सामन्यात हरल्यानंतर त्यातून सावरुन लगेचच सचिनने महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी पदार्पण कसं केलं? ह्या आणि अश्या अनेक विषयांवर मनमोकळेपणे बोलत सचिनने त्याचा क्रिकेटचा प्रवास उलगडला आहे अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये..

Duration:00:45:51

Ask host to enable sharing for playback control

Jasprit Bumrah, Hardik Pandya & Axar Patel: Diamonds of IPL | Ep 1 |

4/18/2024
April 18, 2008. The first match of the IPL was played between Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders. IPL is into its 17th season and has seen numerous players turn up for different franchises. Some players turned out to be only one-season wonders. The likes of MS Dhoni, Rohit Sharma, Virat Kohli and Dinesh Karthik, who played in the inaugural IPL season, are still active. The talent IPL has seen is enormous. It has honed some of the superstars of world cricket. In this IPL special series ‘IPLchi Ratne Pt 1’, we look at three stellar players who made their name in the IPL. All three players hail from Gujarat. Jasprit Bumrah and Hardik Pandya were scouted and signed by Mumbai Indians and they’re integral to Mumbai’s success. Axar Patel was with Mumbai in 2013, but his breakthrough season was in 2014 with Punjab Kings. The first episode of the series is presented by freelance journalist Rujuta Luktuke and the Hindu’s sports journalist Amol Karhadkar… १८ एप्रिल २००८ ला IPLचा पहिला सामना खेळला गेला आणि २०२४मध्ये IPLचा १७वा हंगाम सुरु आहे. IPLने काही खेळाडू असे पहिले कि ज्यांचा प्रभाव केवळ एखाद-दोन हंगाम होता तर महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक सारखे काही खेळाडू असे आहेत जे पहिल्या हंगामापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPLमध्ये खेळत आहेत. IPLने केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटला देखील एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. काही युवा आणि उभरत्या खेळाडूंची कारकीर्द IPLने घडवली. IPLची रत्ने ह्या IPL विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपण असे तीन खेळाडू बघणार आहोत ज्यांनी IPLमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आणि आज ते भारतीय संघाचे अविभाज्य खेळाडू आहेत. तिन्ही खेळाडू गुजरात राज्यातून येतात, दोघे अजूनही मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात तर एका खेळाडूने मुंबई इंडियन्स संघासोबत एक हंगाम घालवला व पंजाबला जाऊन आपली छाप पाडली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे ते तीन खेळाडू आहेत. मालिकेचा पहिला भाग सादर करत आहेत मुक्त पत्रकार ऋजुता लुकतुके आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर...

Duration:00:21:05

Ask host to enable sharing for playback control

World Cup Team Selection: Who gets the ticket to America?

4/16/2024
As the IPL approaches midway mark, the debate for the who goes to the World Cup is gaining traction. Every week some new name in thrown into the mix. But what goes behind the selection process? What is team management's thinking about it? The hottest topic of discussion is who are the two wicketkeeper batters in the side? Has Shivam Dube confirmed his ticket to America?

Duration:00:45:24

Ask host to enable sharing for playback control

Akola to Gujarat Titans via Nagpur: The Darshan Nalkande story

4/15/2024
Darshan Nalkande started playing cricket in his home town, Akola, at a young age. At 13, he was selected into Vidarbha Cricket Association’s residential academy, Nagpur. To pursue his cricketing dream, he moved to Nagpur. Throughout his formative years, his parents backed his dream and today Darshan has ensured that his parents’ hardships were not in vain. At 25, he is an integral part of the Vidarbha cricket team in all three forms of the game. Darshan was part of the Punjab Kings set-up for three years but did not get a game. In 2022, he moved to Gujarat Titans and made his IPL debut against his former side. His maiden IPL wicket - his Vidarbha teammate Jitesh Sharma. In IPL 2023 Qualifier 1, he got the wicket of Ruturaj Gaikwad but he had bowled a no-ball. How did a coach like Ashish Nehra help him move on from that mistake and focus on the game ahead? What has changed in the Gujarat Titans’ camp under the captaincy of Shubman Gill? Darshan Nalkande reflects on his journey and the future on IPL Uwaach with The Hindu’s sports journalist Amol Karhadkar… दर्शन नळकांडेने अकोल्यात क्रिकेट खेळायला सुरवात केली आणि त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या आई-वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. वयाच्या १३व्या वर्षी त्याची निवड विदर्भ क्रिकेट अकादमीच्या निवासी अकादमीत झाली आणि तिथून त्याची गाडी सुसाट सुटली. आज दर्शन विदर्भाच्या तिन्ही संघात एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये गेला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने विदर्भाचा सहकारी जितेश शर्माचा बळी देखील घेतला. IPL पदार्पण, IPL २०२३ क्वालिफायरमध्ये ऋतुराज गायकवाडची नोबॉलवर विकेट घेणं आणि त्या चुकीतून सावरून पुढे असलेल्या सामन्यावर लक्ष केंद्रित करणं ह्याबद्दलही दर्शन बोलला आहे. प्रशिक्षक आशिष नेहरा बरोबर काम करायचा काय अनुभव असतो? २०२४मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आहे, त्याचा संघावर किती परिणाम झाला आहे? ह्या आणि अश्या अनेक गोष्टींवर दर्शनने द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरसोबत गप्पा मारल्या आहेत IPL उवाचच्या ह्या भागात..

Duration:00:34:23

Ask host to enable sharing for playback control

Why they are called one-season wonders of IPL | EP 2

4/11/2024
The Indian Premier League (IPL) began in 2008 and in 16 seasons, the league has grown exponentially. The IPL has taken Indian cricket to the next level in every possible way. There have been moments on and off the field that will forever stay in people's memories. The IPL has seen the rise and fall of some superstars. Some cricketers will always be remembered for their consistency over the years, while others will always be remembered for that one inning or a season. Sports Katta’s IPL special series ‘Ekaach Maaleche Mani’ presented by Rujuta Luktuke and Aditya Joshi, brings you three such names in the second episode of the two-part series. A leggie Rahul Sharma, who starred for now defunct Sahara Pune Warriors, 2012 IPL winner Manvinder Bisla and Sunrisers Hyderabad speedster Umran Malik, who still has a long career ahead but is yet to live up to the expectations… २००८मध्ये IPLला सुरुवात झाली आणि आजपर्यंतचे १६ हंगाम अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांनी गाजवले. काही गोष्टी मैदानावर तर काही गोष्टी मैदानाबाहेर घडल्या. IPL मुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलं ह्याबाबत दुमत नाही. IPL मधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे काही खेळाडू आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात तर काही खेळाडू त्यांच्या ठराविक खेळीमुळे... स्पोर्ट्स कट्टाच्या ह्या IPL विशेष मालिकेत मुक्त पत्रकार ऋजुता लुकतुके आणि आदित्य जोशीने अश्या काही खेळाडूंचा जे केवळ त्यांच्या एका ठराविक हंगामामुळे लक्षात राहतात. IPL मधील एकाच माळेचे मणी मालिकेच्या दुसऱ्या भागातील खेळाडू आहेत लेगस्पिनर राहुल शर्मा जो आता अस्तित्वात नसलेल्या सहारा पुणे वॉरियर्स संघाकडून खेळताना चमकला होता, २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या IPL विजेतेपदात महत्त्वाचा वाटा असलेला मनविंदर बिस्ला आणि ज्याच्या पुढे अजूनही बरीच कारकीर्द शिल्लक आहे असा उमरान मलिक..

Duration:00:16:38

Ask host to enable sharing for playback control

Virat Kohli and his equation with 'strike-rate'

4/10/2024
Virat Kohli scored a 67-ball hundred against the Rajasthan Royals, the joint-slowest hundred in the IPL hundred. His strike rate in that innings was 156.94. However, Rajasthan Royals easily chased the target with Jos Buttler scoring 100* at a strike rate of 172.41. What does that say about their innings? Should strike rate be the only yardstick to judge a batter's performance?

Duration:00:44:12

Ask host to enable sharing for playback control

Bablu Patil : A cricketer in ‘Khaki’ uniform

4/6/2024
Bablu Patil began his cricketing journey way back in 2004 at 19. However, he knew cricket could not be his only source of livelihood and joined the Maharashtra Police in 2006. However, his love for sports saw him participate in various tournaments as a sprinter with the police force. As part of the State Reserve Police Force (SRPF), he often had to visit the Naxalite area of Maharashtra -Gadchiroli. Even in that remote area, he organised cricket tournaments for locals. However, his loyalty is to his uniform and not a cricket jersey. Cricket takes a backseat when he is called upon by the State. To live by that principle, he had to miss out on opportunities to play cricket abroad. But he has no regrets. He has seen tennis-ball cricket evolve in the past 20 years. Bablu shares his incredible journey of balancing ‘duty and cricket’ on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale… बबलू पाटील २००४ साली १९व्या वर्षी पहिल्यांदा स्पर्धात्मक टेनिस-बॉल क्रिकेट खेळले आणि तिथून त्यांच्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली. केवळ क्रिकेटवर घर चालणार नाही ह्याची जाणीव असल्याने २००६मध्ये पोलीस भरतीची परीक्षा देऊन ते महाराष्ट्र पोलीस दलात सामील झाले. आजघडीला मुंबईतल्या ताडदेव पोलीस स्टेशनला ते नियुक्त आहेत. पण राज्य राखीव पोलीस दलाचा (SRPF) भाग असल्याने अनेकदा गडचिरोलीतल्या नक्षलवादी भागात देखील त्यांना ड्युटीवर जावं लागलं आहे. पोलीस दलात देखील त्यांनी खेळाबरोबर जवळीक सोडली नाही आणि विविध ठिकाणी ड्युटी सांभाळून क्रिकेट खेळत राहिले. इतकंच काय तर नक्षलवादी भागातदेखील त्यांनी स्थानिकांसाठी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं. असं जरी असलं तरी त्यांना त्यांच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे. 'आधी वर्दी, मग क्रिकेट!' हे तत्व ते कायम पाळत आले आहेत आणि त्यापायी त्यांनी भारताबाहेर क्रिकेट खेळायच्या संधीवर अनेकदा पाणी सोडलं. पण त्याची त्यांना खंत नाही. त्यांच्या २० वर्षाच्या प्रवासात त्यांनी टेनिस-बॉल क्रिकेट आमूलाग्र बदलताना बघितलं आहे. बबलू पाटीलांनी त्यांच्या ह्या विलक्षण प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले बरोबर..

Duration:00:27:11

Ask host to enable sharing for playback control

Why they are called one-season wonders of IPL | EP 1

4/4/2024
The Indian Premier League (IPL) began in 2008 and in 16 seasons, the league has grown exponentially. The IPL has taken Indian cricket to the next level in every possible way. There have been moments on and off the field that will forever stay in people's memories. The IPL has seen the rise and fall of some superstars. Some cricketers will always be remembered for their consistency over the years, while others will always be remembered for that one inning or a season. Sports Katta’s IPL special series ‘Ekaach Maaleche Mani’ presented by Rujuta Luktuke and Amol Karhadkar, brings you three such names in the first episode of the two-part series. 2008 IPL winner Swapnil Asnodkar, First Mumbai batter to score an IPL hundred Paul Valthaty and legend of South Africa cricket Hashim Amla. २००८मध्ये IPLला सुरुवात झाली आणि आजपर्यंतचे १६ हंगाम अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांनी गाजवले. काही गोष्टी मैदानावर तर काही गोष्टी मैदानाबाहेर घडल्या. IPL मुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलं ह्याबाबत दुमत नाही. IPL मधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे काही खेळाडू आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात तर काही खेळाडू त्यांच्या ठराविक खेळीमुळे... स्पोर्ट्स कट्टाच्या ह्या IPL विशेष मालिकेत मुक्त पत्रकार ऋजुता लुकतुके आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने आढावा घेतला अश्या काही खेळाडूंचा जे केवळ त्यांच्या एका ठराविक हंगामामुळे लक्षात राहतात. IPL मधील एकाच माळेचे मणी मालिकेच्या पहिल्या भागातील खेळाडू आहेत २००८ IPL विजेता स्वप्नील अस्नोडकर, IPLमध्ये शतक झळकावणारा पहिला मुंबईकर पॉल वल्थाटी आणि दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजांपैकी एक हशिम आमला...

Duration:00:21:56

Ask host to enable sharing for playback control

Rishabh Pant frontrunner for wicketkeeper's slot for T20 World Cup?

4/3/2024
Rishab Pant dazzled with a scintillating half-century in Delhi Capitals' victory over Chennai Super Kings. Pant, who is back in action after a long lay-off, is getting sharper by the innings and is putting his name in the hat for the T20 World Cup selection. Despite their first loss of the season, Ruturaj Gaikwad has impressed as a skipper after taking over the reins from MS Dhoni. The Wankhede crowd jeered Hardik Pandya and was 'asked to behave' by commentator Sanjay Manjarekar. The crowd didn't oblige. Rather they were forced to dance to the tunes of Riyan Parag as Rajasthan Royals thumped Mumbai Indians. रिषभ पंतने त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची तो सज्ज असल्याचे संकेत दिलेत. पण भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात नक्की कोणाकोणाला यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळेल? ऋतुराज गायकवाडने त्याच्या कर्णधारपदाची शैलीने छाप पाडली आहे. दुसरीकडे मात्र हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे मुंबईचे चाहते चांगलेच नाराज आहेत आणि ती नाराजी त्यांनी वानखेडे स्टेडियमवर अशी दर्शवली कि समालोचक संजय मांजरेकरला प्रेक्षकांना 'चांगलं वागा' असं सांगावं लागलं. ह्या सगळ्या घडामोडींवर चर्चा केली आहे आदित्य जोशी, अमोल गोखले आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने वीकली कट्ट्यावर..

Duration:00:44:23

Ask host to enable sharing for playback control

Sahil Godbole: A Marathi cricket entrepreneur in Australia

3/30/2024
Sahil Godbole is a Sydney-based financial crime analyst working with a reputed bank. That’s his bread and butter. However, as a passionate cricket lover, he runs a side business of bat repairs. He started this venture out of his garage during the COVID-19 lockdown after he successfully repaired the broken bat of one of his housemates. In these last four years, he has repaired around 600 bats and it’s been all training on the job. Some of the distinguished bats he has fixed include the willows of Sri Lankan legend Kumar Sangakkara and Proteas batter Quinton de Kock. Sahil shares insights into his business, why India is the No. 1 country in sports goods manufacturing and his brushes with the Australian cricket team on ‘Padadyamageel Shiledaar’ with Amol Gokhale… साहिल गोडबोले सिडनीमध्ये एका बँकेत आर्थिक गैरव्यवहार निगडीत क्षेत्रात काम करतो. तो त्याचा पोटापाण्याचा धंदा आहे. पण त्याव्यतिरिक्त त्याचा स्वतःचा बॅट दुरुस्त करायचा उद्योग आहे. कोरोनाच्या काळात घरातल्या एका मित्राची बॅट तुटली म्हणून YouTube वर बघून साहित्य मागवून, घरच्या गॅरेजमध्ये त्याने ती बॅट दुरुस्त केली आणि तिथून त्याच्या बॅट दुरुस्तीच्या व्यवसायाला सुरुवात झाली. गेल्या ३-४ वर्षात साहिलने ६०० बॅट दुरुस्त केल्यात आणि त्यात कुमार संगकारा आणि क्विंटन डी कॉक ह्यांनी वापरलेल्या बॅट्सचा देखील समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट्स त्याने कश्या दुरुस्त केल्या किंवा बॅट्सची निगा कशी ठेवावी ह्यावर त्याने गप्पा मारल्या आहेत. आज भारत क्रीडा साहित्य उत्पादनात अग्रेसर देश कसा आहे आणि त्याचा त्याच्या उद्योगावर कसा चांगला परिणाम होतो हे देखील त्याने उलगडलं आहे. 'पडद्यामागील शिलेदार' ह्या मालिकेत साहिल गोडबोलेने गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले बरोबर...

Duration:00:26:22

Ask host to enable sharing for playback control

Ketan Mhatre: The Biker Man of tennis-ball cricket

3/27/2024
Ketan Mhatre started his cricket journey playing underarm cricket before being picked for his village’s tennis-ball cricket team. However, he didn’t get an opportunity right away. He had to be the 12th man for a considerable time but Ketan was clear about what he wanted to do. When the opportunity came, he grabbed it with both hands. His reward for taking his opportunity was a sports bike. First of his many. Today, he has earned so many bikes as prizes, his identity is the ‘Biker Man’ of tennis-ball cricket. He was picked by the Chennai Singam team for ₹16.5 lakh in the Indian Street Premier League (ISPL) auction. Ketan Mhatre shares his story with Amol Gokhale on Kattyawarchya Gappa… केतन म्हात्रेने अंडरआर्म क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि हळूहळू तो गावातल्या टीममधून क्रिकेट खेळायला लागला. पण सुरुवातीची काही वर्ष तो संघात जरी असला तरी बरेचदा १२वा खेळाडू असायचा. पण इतर खेळाडूंप्रमाणे आपल्यालादेखील लोकांनी ओळखावं अशी त्याची ईच्छा होती आणि त्याच जिद्दीतून त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पहिल्यांदा मोटरसायकल बक्षिस म्हणून जिंकली. आज त्याची ओळख टेनिस-बॉल क्रिकेटचा Biker Man अशी आहे कारण त्याने आत्तापर्यंत ३०हुन अधिक मोटरसायकली बक्षिसादाखल मिळवल्या आहेत. घरच्यांचा आणि कामाच्या ठिकाणाहून त्याच्या खेळाला कायम पाठिंबा मिळाला आणि त्याजोरावर त्याने टेनिस-बॉल क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीगमध्ये (ISPL) चेन्नई सिंघम संघाने त्याच्यावर ₹१६.५० लाखाची बोली लावली होती. केतन म्हात्रेने हा त्याचा प्रवास उलगडला आहे अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

Duration:00:18:16

Ask host to enable sharing for playback control

Should Hardik Pandya be replaced as Mumbai Indians captain?

3/27/2024
Hardik Pandya moved back to Mumbai Indians from Gujarat Titans and was subsequently named the team's captain. The move and his appointment haven't gone down well with fans of both teams. He is getting trolled on social media platforms mercilessly. In Mumbai Indians' season opener against Gujarat Titans in Ahmedabad, fans of both teams jeered him constantly. Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu and Amol Gokhale analyze events surrounding Hardik Pandya and the backlash he has received, in the Live episode of Weekly Katta...

Duration:00:54:34

Ask host to enable sharing for playback control

When Tushar Deshpande justified Mahendra Singh Dhoni's faith in him during IPL 2023

3/23/2024
When Tushar Deshpande made his Sports Katta debut in 2020, he was yet to earn an Indian Premier League cap. As he returns to Sports Katta for another conversation in our special series 'IPL Uwaach', he not only has an IPL title to his but has also been crowned Ranji Trophy champion. Add to that the fact that Deshpande was Chennai Super Kings' highest wicket-taker during its triumphant IPL 2023 campaign and it underlines the boy from Kalyan has indeed come a long way. In a freewheeling chat with Amol Karhadkar, sports journalist with The Hindu, Tushar Deshpande relives how he reposed the faith shown in him buy Mahendra Singh Dhoni. तुषार देशपांडे जेव्हा २०२० मध्ये जेव्हा पहिल्यांदा स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारायला आला, तेव्हा त्याने IPL मध्ये पदार्पण केलं नव्हतं. आज तो चेन्नई सुपर किंग्जच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०२३ मध्ये त्याने चेन्नईच्या IPL विजेतेपदात मोलाची भूमिका बजावताना संघासाठी सर्वाधिक बळी तर घेतलेच, पण काही काळ त्याच्याकडे 'पर्पल कॅप' सुद्धा होती. 'द हिंदू' चा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरशी 'IPL उवाच' मध्ये तुषार सांगत आहे गेल्या चार वर्षांतील त्याच्या कारकीर्दीतील बदल; महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईकडून खेळण्याचा अनुभव; धोनीने टाकलेला विश्वास त्याने कसा सार्थ ठरवला; आणि IPL जिंकल्यानंतरची भावना...

Duration:00:31:34

Ask host to enable sharing for playback control

Krishna Satpute: God of Tennis-ball Cricket

3/22/2024
The world of tennis-ball cricket is unearthed and beyond imagination. In the last few years, it has blossomed. The fan base of tennis-ball cricket is growing exponentially courtesy of live-streaming platforms. Players have made a decent career playing tennis-ball cricket as the sport became commercially viable. Krishna Satpute @KrishnaSatputeOfficial is the superstar of this ‘tennis-ball’ world. The fans fondly call him the ‘God of Tennis-Ball Cricket’. On the sidelines of the Indian Street Premier League (ISPL), Krishna opens up about the difference between a tennis ball & leather ball cricket, the importance of such tournaments and a lot more in this episode of Kattyawarchya Gappa with Amol Gokhale… टेनिस-बॉल क्रिकेटची व्याप्ती आणि पसारा वाटतं त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. प्रत्येक लहान-मोठ्या खेळाडूने आयुष्यात कधी ना कधी टेनिस-बॉलने क्रिकेट खेळलं आहे आणि अनेक खेळाडू टेनिस-बॉल क्रिकेटपासून सुरुवात करुन भारतासाठी पण खेळले आहेत. भारतभर टेनिस-बॉलच्या स्पर्धा होतात आणि त्याचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. गेल्या काही वर्षांत टेनिस-बॉल क्रिकेटला व्यवसायिक स्वरूप आलं आहे. काही खेळाडू टेनिस क्रिकेटवर घर चालवू शकतात इतके मोठे झाले आहे आणि कृष्णा सातपुते हा टेनिस-बॉल क्रिकेटचा इतका मोठा सुपरस्टार आहे कि लोकांनी त्याला सचिन तेंडुलकरसारखी 'गॉड ऑफ टेनिस-बॉल क्रिकेट' अशी पदवी दिली आहे. इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीगच्या (ISPL) निमित्ताने कृष्णाने स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारल्या. टेनिस आणि लेदर बॉल क्रिकेट मधला फरक, टेनिस क्रिकेटमधला सुपला शॉट आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होण्याचं महत्त्व या सगळ्याबद्दल अमोल गोखलेने कृष्णाला बोलतं केलं आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

Duration:00:15:01

Ask host to enable sharing for playback control

Playing with Prithvi Shaw to conquering tennis-ball cricket: Sumeet Dhekale's story

3/21/2024
Sumit Dhekale started his cricketing journey at 16, playing leather-ball cricket. At the same time, he would also indulge in various kinds of tennis-ball cricket viz box cricket, light-tennis etc. As he became better and better with tennis-ball cricket, the leather-ball cricket took a back seat. However, even today he likes leather-ball cricket better and plays in leather-ball tournaments whenever time permits. There’s an ear-to-ear grin on his face as he recalls winning the Mumbai Premier League with Prithvi Shaw and dancing their hearts out on the team bus. He led the Chennai Singam team in the recently concluded Indian Street Premier League (ISPL) and hopes that tournaments like these will be a boon for tennis-ball cricket. He shares his cricketing journey, memories of playing against Pakistan and the feeling of winning the prestigious Supremo Trophy five times on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale… सुमित ढेकळेने वयाच्या १६व्या वर्षी लेदरच्या चेंडूवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण त्याचबरोबर तो बॉक्स क्रिकेट, लाईट टेनिस-बॉल, हार्ड टेनिस-बॉल असं टेनिस चेंडूवर खेळलं जाणारं वेगवेगळं क्रिकेट पण खेळायचा. जसं-जसं टेनिस-बॉल क्रिकेटची सुमितची हातोटी वाढली तसं लेदर चेंडूचं क्रिकेट मागे पडलं. पण अजूनही जेव्हा संधी मिळते तेव्हा सुमित लेदर चेंडूवर खेळतो आणि आजही त्याची त्यालाच पसंती आहे. पृथ्वी शॉ बरोबर कशी मुंबई प्रीमियर लीग जिंकली आणि संघाच्या बसमध्ये कसे नाचलो हे सांगताना त्याचा आजही चेहरा खुलतो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये (ISPL) त्याने चेन्नई सिंघम संघाचं कर्णधारपद भूषवलं आणि त्याला अशा आहे कि ह्या स्पर्धेने टेनिस-बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस येतील. त्याचबरोबर त्याने भारत-पाक सामना खेळण्याचा अनुभव, टेनिस-बॉल विश्वातली मनाची सुप्रीमो ट्रॉफी पाच वेळा जिंकण्याची भावना आणि त्याचा क्रिकेटचा प्रवास उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखलेबरोबर...

Duration:00:24:00

Ask host to enable sharing for playback control

Vishu Jadhav: Nala Sopara's diamond in tennis-ball cricket

3/20/2024
Vishwanath ‘Vishu’ Jadhav used to play under-arm cricket as a kid and always wanted to be a batter. He often used to accompany his local team to cricket games but never liked it when he was used just as a fielder. Even then he was clear about two things - he enjoys batting and he doesn’t enjoy studying. Vishu used to roll his arm in practice and would do well against left-handed batters. But one day he was asked to defend a small total against a south-paw batter and he managed to do that. That’s how he became an all-rounder. Today, he travels across Maharashtra and internationally to play tennis-ball cricket and has carved a successful career for himself. He shares his journey with Amol Gokhale in this episode of Kattyawarchya Gappa… विश्वनाथ 'विशू' जाधवने त्याच्या धानीव ह्या नालासोपाऱ्यातल्या गावात लहानपणी अंडरआर्म क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याला कायम फलंदाज व्हायचं होतं. लहानपणापासून विशूला दोन गोष्टी पक्क्या ठाऊक होत्या. एक म्हणजे, जर त्याला फलंदाजी मिळणार असेल तरच त्याला क्रिकेट खेळण्यात रस होता आणि दुसरं म्हणजे अभ्यासात बिलकुल रस नव्हता. पण प्रॅक्टिसमध्ये डावखुऱ्या फलंदाजांना चांगली गोलंदाजी करतो म्हणून त्याला सामन्यात पण गोलंदाजी मिळाली आणि तिथून विशू फलंदाजाचा अष्टपैलू झाला. आज विशू केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारताबाहेरही टेनिस-बॉल क्रिकेट खेळायला जातो आणि त्यात त्याने यशस्वी कारकिर्द घडवली आहे. त्याचा हा अंडरआर्म क्रिकेट ते इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीगपर्यंतचा प्रवास त्याने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखलेबरोबर...

Duration:00:18:47

Ask host to enable sharing for playback control

IPL 2024 or selection trials for the T20 World Cup?

3/19/2024
The IPL 2024 (Indian Premier League) will kick off on March 22 with the Southern Derby between Chennai Super Kings and Royal Challengers Bangalore. But this IPL feels different from the rest. Why so? Not just the players, but even selectors are padding up for what follows next. The T20 World Cup that begins on June 1. Players will be eager to make their cases and earn a ticket to the West Indies and the USA. Captain Rohit Sharma, his deputy Hardik Pandya, Suryakumar Yadav and Jasprit Bumrah are the only players who have confirmed tickets for the World Cup. Even Virat Kohli’s spot is up for the debate. So, is it just another year of IPL or is it a selection trial for the T20 World Cup berth? Aditya Joshi, Amol Gokhale and Amol Karhadkar ponder on Weekly Katta… IPL २०२४ चं बिगुल वाजलंय. जातविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू २२ मार्चपासून पुढचे आठ आठवडे IPLचा धुरळा उडवणार आहेत. त्याचबरोबर त्या त्या संघांचे चाहते देखील सोशल मीडियावर एकमेकांना भिडतील. पण एकंदरीतच हे IPL वेगळं वाटतंय. कारण IPL नंतर लगेचच आठवड्याच्या आत १ जून पासून T२० विश्वचषक सुरु होईल. त्यामुळे खेळाडूंबरोबरच निवडसमितीची देखील परीक्षा असणारे. कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे चौघं वगळता कोणाचंच स्थान पक्कं नाहीये. विराट कोहलीच्या स्थानावर देखील प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे जुन्या-नव्या सर्व खेळाडूंना आपलं नाणं खणखणीत वाजवावं लागणारे. त्यामुळे यंदाचं IPL फक्त IPL असेल का वर्ल्ड कपची निवड चाचणी हा कळीचा मुद्दा आहे आणि त्यावर वीकली कट्टयावर चर्चा करत आहेत आदित्य जोशी, अमोल गोखले आणि अमोल कऱ्हाडकर...

Duration:00:35:53