स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum-logo

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts & Culture Podcasts

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Location:

United States

Description:

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Language:

English


Episodes
Ask host to enable sharing for playback control

सृजनाच्या वाटेवर....मिलिंद जोशी (१)

5/11/2024
सर्जनशीलतेची अनिवार ओढ मनात असेल तर आपला `आरसा` होतो म्हणजे नेमकं काय घडतं? शब्द, स्वर, संगीत आणि अमूर्त चित्रांच्या आगळ्या विश्वात रममाण होत आगळं जगणं जगणारे प्रतिभावंत कलाकार मिलिंद जोशी यांनी आपल्या सृजनरंगात रंगण्याचा प्रवास खास कट्ट्याच्या श्रोत्यांपुढे उलगडून दाखविला आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या संवेदनशील कलाकाराची, त्याच्या भावविश्वाची हळूवार उलगड मिलिंद जोशी यांच्या समवेत संतोष देशपांडे यांनी मारलेल्या या गप्पांमधून होतो. अशा या सृजनाच्या वाटेवरच्या गप्पांचा हा पूर्वार्ध तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, हे नक्की.

Duration:00:41:00

Ask host to enable sharing for playback control

करिअरची निवड करताना...

5/4/2024
दहावी-बारावीनंतर आता खरे वेध लागले आहेत ते पुढच्या करिअरसाठी अभ्यासक्रम निवडण्याचे. खरं तर करिअर मार्गदर्शन हे वेळेवर आणि अचूक होणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच खास कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक प्रा. केदार टाकळकर यांना. करिअरची निवड कशी करावी हे सांगतानाच टाकळकर सरांनी अनेक गोष्टींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड करुन दिली आहे, छानशा टिप्सही दिल्या आहेत. करिअरविषयी विचारात असणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावा असा हा विशेष पॉडकास्ट.

Duration:00:38:39

Ask host to enable sharing for playback control

डॅम इट आणि महेश कोठारे

4/27/2024
प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते महेश कोठारे हे मराठी सिनेजगतातील सुपरस्टार. त्यांनी लिहिलेले `डॅम इट आणि बरंच काही...` हे आत्मचरित्र त्यांच्याच आवाजात आता `स्टोरीटेल`वर आले आहे. त्यानिमित्त पुण्यात त्यांचा विशेष गौरव झाला. त्या प्रसंगी खुद्द महेश कोठारे, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, सिनेपत्रकार व तारांगणचे संपादक मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. त्यात कोठारे यांनी या आत्मचरित्रामागची पार्श्वभूमी उलगडून दाखविली, फुटाणे यांनी कोठारे यांच्या चित्रपटसेवेतील महत्त्व अधोरेखित केले, तर मंदार जोशी यांनी या पुस्तकाच्या निर्मितीवेळच्या आठवणींना उजाळा दिला. स्टोरीटेल वर `डॅम इट आणि बरंच काही` ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/damn-it-ani-barech-kahi-2819989

Duration:00:15:16

Ask host to enable sharing for playback control

प्रा. भास्कर चंदनशिव सरांचं साहित्यचिंतन!

4/20/2024
आपल्या कसदार लेखणीतून ग्रामीण मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देणारा लेखक अशी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची साहित्यजगतात ओळख आहेच. हा व्रतस्थ लेखक आपल्या कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी बोलता झाला आहे. प्रा. चंदनशिव सरांनी संतोष देशपांडे यांसमवेत संवाद साधताना मराठी साहित्यातील विविध प्रवाह, त्यांचा प्रवास, त्यातील विविध टप्पे यांची उलगड करुन दाखवली आहे. ज्यास आपण समकालीन साहित्य म्हणतो, ते नेमके काय आहे, चिरंतन टिकणारं साहित्य कोणतं इथपासून ते काय वाचावं इथपर्यंत त्यांनी आपल्या चिंतनात सुरेख भाष्य केलं आहे. तमाम मराठी साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरेल, असा हा पॉडकास्ट प्रत्येकाने आवर्जून ऐकायलाच हवा आणि इतरांपर्यंत पोहोचवायलाच हवा...कारण हा आहे एक आगळा आणि अनमोल असा साहित्यिक दस्तऐवज.

Duration:00:52:40

Ask host to enable sharing for playback control

`एआय`च्या युगात करिअरच्या दिशा कुठल्या?

4/13/2024
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान वेगाने सर्वत्र विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात चांगले करिअर घडण्यासाठी काय शिकायला हवे, कोणता दृष्टिकोन विकसित करावा लागेल, याची माहिती सर्वांना असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयी मार्गदर्शन केले आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या संवादातून. प्रत्येक सजग पालकाने आणि करिअरविषयी गंभीर असणाऱ्या विद्यार्थ्याने ऐकायलाच हवा, असा हा पॉडकास्ट.

Duration:00:19:35

Ask host to enable sharing for playback control

संवाद...एका `संवादमित्रा`शी!

4/6/2024
सुनील महाजन म्हणजे आपल्या सांस्कृतिक चळवळीस वाहून घेतलेले एक अवलिया व्यक्तिमत्व. आपल्या `संवाद, पुणे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर बालनाट्य चळवळ, नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध प्रांतांत विलक्षण उत्साहाने अनेक संकल्पना रुजविल्या, त्यातील व्यक्तिमत्वं घडविली, माणसं जोडली आणि त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणी खंबीरपणे पाठीशीही उभे राहिले. नुकतेच त्यांनी वयाची ६१ वर्षे पूर्ण केली आणि त्यानिमित्त त्यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं तेव्हा उलगडला तो त्यांचा थक्क करणारा प्रवास. सांस्कृतिक चळवळीतील सच्चा कार्यकर्ता असं बिरुद अभिमानाने मिरवू पाहणाऱ्या सुनील महाजनांचा हा प्रवास, त्यांना आलेले अनुभव ऐकणं, हा देखील एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.

Duration:00:44:05

Ask host to enable sharing for playback control

`भविष्य नावाचा इतिहास` लिहिताना...

4/2/2024
आजच्या बदलांचा वेग लक्षात घेता भविष्यातील मानवजीवन, त्याची व्यवस्था, तेव्हाचे जगाचे मानसिक वास्तव याचा भेदक वेध घेणारी विलक्षण कादंबरी प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिली आहे. ती नुकतीच प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने आजचे भविष्य अन् उद्याचा इतिहास यांच्या दरम्यान उलगड जाणाऱ्या अनेक पैलूंचा वेध एका विलक्षण कथानकातून कसा घेता आला, याची उलगड संजय सोनवणी यांनी संतोष देशपांडे यांच्यासमवेत रंगलेल्या या गप्पांमधून केली आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उद्योगक्षेत्रात काळाच्या पुढचा विचार करीत सोनवणी यांनी स्वतः ज्यावर मोठे काम केले होते अशा `हेलिकार` तसेच `कॉन्टम फिजिक्स`सारख्या संकल्पनांची उकलही या संवादातून प्रथमच श्रोत्यांपुढे होते. प्रत्येकाचे आवर्जून ऐकावा असा हा संवाद नवी दृष्टी देऊन जातो.

Duration:00:26:41

Ask host to enable sharing for playback control

राजकवी तांबेंच्या `भारा`वलेल्या आठवणी...

3/30/2024
मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात, असे राजकवी भा.रा. तांबे यांच्या कवितांचे गारुड तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ रसिकांवर टिकून आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, नववधु प्रिया मी बावरते, मधु मागसि माझ्या सख्या परि, कशी काळनागिनी, घन तमी शुक्र बघ राज्य करी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या अशा त्यांच्या कित्येक रचना आपल्या अंतरीचा तळ ढवळतात. अशा या राजकवींचे नातू शिरीष तांबे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संवादातून त्यांनी तो काळ आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि ऐकता ऐकता आपणही `भारा`वून जातो...स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.

Duration:00:48:49

Ask host to enable sharing for playback control

`शहिदांच्या पत्रां`ची गोष्ट...

3/22/2024
देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे म्हणजे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. 93 वर्षांपूर्वी या तिघांना फाशीवर चढविण्यात आले. मात्र, आपल्या बलिदानातून त्यांनी तरुणाईला देशासाठी निधड्या छातीने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राखण्यासाठी आजही २३ मार्च शहिद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांचा एकमेकांमधील पत्रव्यवहार जेव्हा पुढे आला, तेव्हा त्यांच्या मनातील अंतरंगाची, त्यात दडल्या भावनांची हळवी आणि तितकीच ठाम अशी उलगड होते. ती समाजापुढे आणण्यासाठी हरहुन्नरी असे ज्येष्ठ कलाकार सुधीर मोघे यांनी मोठ्या प्रयत्नांतून `शहिदांची पत्रे` नावाने अत्यंत हृद्य असे सादरीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचीच उलगड करण्याचा प्रयत्न केला आहे संतोष देशपांडे यांनी. देशप्रेमाचा ओलावा मनात जपतानाच, ध्येयाचा अंगारही फुलविणारी ही शहिदांची पत्रे सर्वांपुढे आलीच पाहिजेत, अशा हेतूने हा संवादही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू या.

Duration:00:32:53

Ask host to enable sharing for playback control

`ती` आनंदी तर घर सुखी...

3/15/2024
कुटुंबातील महिला ही खरंतर त्या घराला पुढे घेऊन जात असते. घरात कोणी आजारी पडले तरी त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य तिच्यात पुरुषांच्या तुलनेत खचित अधिकच असते. अशी ही स्त्री आजारी पडली तर घरची अख्खी घडी विस्कळीत होऊन जाते. मग, हे असं का घडतं, याचा वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून मागोवा घेतला आहे पुण्यातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. नेहा कुलकर्णी यांनी, संतोष देशपांडे यांंसमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमधून. आपल्या कुटुंबातील स्त्रीला आनंदी राखलं तर तिचं शारीरिक व मानसिक स्वास्थही आपोआप चांगलं राखलं जातं. त्यासाठी काय करायला हवं, याची छानशी उलगड डॉ. नेहा कुलकर्णी यांनी करुन दाखवली आहे, जी प्रत्येकाने ऐकायलाच हवी.

Duration:00:35:43

Ask host to enable sharing for playback control

आकाशाशी जडता नाते.... (विमेन्स डे स्पेशल)

3/8/2024
हा प्रवास आहे एका विलक्षणाचा शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणीचा, जिनं अगदी वेगळ्या पद्धतीनं आपल्या आवडीचा मार्ग चोखाळला आणि खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःला झोकून दिलं. या क्षेत्रातील तिनं एस्टोनएरा हे आपलं पहिलं स्टार्टअप् वयाच्या १८ व्या वर्षी सुरु केलं. तिच्या कामाची दखल घेत तिला रॉयल एस्ट्रानॉमिकल सोसायटी ऑफ लंडनने आपली फेलोशिप प्रदान केली. भेटूया श्वेता कुलकर्णीला. खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने जगभरात कार्य करणारी ही पुणेकर तरुणी आज कट्ट्याची मानकरी आहे. तिच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून उलगड होते, ती एका स्वप्नाची आणि त्या स्वप्नातून आपलं असं जग निर्माण करणाऱ्या ऊर्जेची. खुद्द जयंत नारळीकर, रघुनंदन माशेलकर यांसारख्या महान शास्त्रज्ञांनी कौतुकाची थाप दिलेल्या श्वेताचा प्रवास ऐकणं हा सुद्धा एक समृद्ध करणारा अनुभव ठरावा.

Duration:00:37:02

Ask host to enable sharing for playback control

नवा सामाजिक `केमिकल लोचा`!

3/2/2024
आज आपण सर्वजण समाज म्हणून एक विलक्षण अस्वस्थता अनुभवत आहोत. एकमेकांविषयी अविश्वास, मनात काही ना काही निमित्ताने सतत निर्माण होत असणारे काहूर, सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात बोलताना घसरलेली भाषा अशी अनेक लक्षणे या नव्या सामाजिक `केमिकल लोचा`ची आहेत. हे असे का होते आहे, त्यापासून दूर होऊन आपण स्थिर होत प्रगतीपथावर कसे राहू शकतो, याचा विचार होणं नितांत आवश्यक आहे. ज्येष्ठ संपादक व चिंतनशील विचारवंत श्री. यमाजी मालकर यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या गप्पांमधून हा विषय अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला आहे. आपल्याला आरसाही दाखवला आहे आणि यातून सुटकेचा मार्गही दाखवला आहे. प्रत्येकाने जरुर ऐकावा, विचार करावा, इतरांनाही ऐकवावा आणि आपल्या आयुष्यातील प्रगतीचा खरा मार्ग अनुसरावा, असा हा खास पॉडकास्ट.

Duration:00:31:16

Ask host to enable sharing for playback control

एका `सचिन`ची जडणघडण!

2/24/2024
नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातील सचिन धस याने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सचिन ज्या बीड शहरातून येतो, तेथे प्रशिक्षणासाठी कोणतीही अनुकूल स्थिती नसतानाही, त्याचे वडील संजय धस यांनी त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक आव्हानांवर आपल्या परीने मार्ग काढीत, शक्य त्यांचे सहकार्य घेत आपल्या सचिनला त्याचा खेळ उंचावण्यासाठी दिशा दिली, ऊर्जा दिली. आपल्या मुलाचा मित्र बनून त्याच्या आयुष्याला आकार दिला. केवळ उत्तम खेळाडूच नव्हे तर एक चांगला नागरिक म्हणूनही त्याची ओळख व्हावी, असा त्यांचा आग्रह असतो. संजय धस यांनी संतोष देशपांडे यांसमवेत साधलेल्या या संवादातून सचिनची जडणघडण तर उलगडतेच शिवाय मुलगा आणि वडील यांच्यातील नात्यांमधील आगळे पैलूही पुढे येतात...मुलांसाठी झटू पाहणाऱ्या पालकांना नवी दृष्टी देतात. स्टोरीटेल कट्ट्याचा हा खास पॉडकास्ट प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा.

Duration:00:47:54

Ask host to enable sharing for playback control

`असा` रंगतोय जागतिक पुस्तक महोत्सव!

2/16/2024
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर सध्या `वर्ल्ड बुक फेअर` म्हणजेच जागतिक पुस्तक महोत्सव रंगतो आहे. देशातील एक अत्यंत भव्य आणि देखणा पुस्तक महोत्सव म्हणून जगभरात त्याचा लौकीक असतो. त्याची मुख्य धुरा सांभाळणारे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी थेट महोत्सवात भेट घेऊन संवाद साधला, खास स्टोरीटेल कट्ट्यासाठी. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.

Duration:00:15:19

Ask host to enable sharing for playback control

होय..`ड्रिम` वर्क्स!

2/10/2024
उद्योजकतेच्या वाटेवर पुस्तकं, माणसं, अनुभव जे जे काही लाभते, त्यातून आपल्यातील सकारात्मकता आणखी वाढवत नेली की नवी दिशा मिळू शकते. तुमचा सूर तुम्हाला गवसू शकतो. व्यवसायाचा कोणताही पूर्वानुभव नसताना, उद्योजकतेची कास धरत लाभलेल्या संधी, भेटलेली माणसं, सूचलेल्या कल्पना आणि आलेले अनुभव या शिदोरीवर उमेश पवार या तरुणाने रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. मागे वळून पाहताना, आता त्याला काय वाटते, कोणते अनुभव आले, त्यातून काय शिकता आले याची विलक्षण उलगड होते, ती त्याच्या संतोष देशपांडे समवेत रंगलेल्या गप्पांमधून. उद्योगाची कास धरु पाहणाऱ्या, उद्योगात स्थिराऊ इच्छिणाऱ्या आणि आजवर उद्योगात राहूनही काहीच हाती लागले नाही असे वाटणाऱ्या सर्वांनी आवर्जून ऐकावा असा हा कट्ट्यावरील स्पेशल पॉडकास्ट. जरुर ऐका आणि सर्वांपर्यंत पोहोचवा.

Duration:01:00:13

Ask host to enable sharing for playback control

गोष्ट एका `तारांगणा`ची!

2/3/2024
चित्रपटसृष्टी, कलाकार यांविषयी आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या क्षेत्राला वाहिलेले मासिक, प्रकाशन सुरु करणे आणि ते अव्याहत चालवणे, हे कार्य प्रत्यक्षात किती आव्हानात्मक असते, याची सर्वांनाच कल्पना असते असे नाही. मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे मराठी मासिक म्हणून वाचकप्रिय असलेल्या `तारांगण`ने नुकतीच आपली १२ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने, `तारांगण`चे संपादक व ज्येष्ठ सिनेपत्रकार मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून तारांगणची आजवरची वाटचाल, त्यातील महत्त्वाचे टप्पे, कलाकार आणि रसिकांना जोडणारे उपक्रम आदींविषयी वेगळी माहिती पुढे येते. स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट श्रोत्यांना एका आगळ्या प्रवासाची ओळख करुन देईल, हे निश्चित.

Duration:00:31:39

Ask host to enable sharing for playback control

`रामराज्य` आले हो...

1/27/2024
अयोद्धानगरीत श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देश राममय झाला. याच काळात, स्टोरीटेलवर `रामराज्य कथा` ही येऊन दाखल झाली. रामराज्य म्हणजे नेमके काय, त्या काळात असे काय होते ज्यामुळे त्यास रामराज्य म्हटले जायचे, तेव्हाचे समाजजीवन कसे होते, समाजापुढचे आदर्श काय होते, परस्परांशी व्यवहार कसे होते या व अशा अनेक गोष्टींची विलक्षण उलगड रामराज्य कथा करतात. या `रामराज्य`ची संकल्पना ज्यांच्यामुळे साकारली ते योगेश दशरथ आणि लेखक संजय सोनवणी यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद, तुम्हाला `रामराज्या`च्या मार्गावर घेऊन जातो. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा. स्टोरीटेलवर रामराज्य कथा ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/ramrajya-katha-2806579 स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans

Duration:00:25:29

Ask host to enable sharing for playback control

पालकहो, जागे व्हा!

1/19/2024
देशातील शालेय शिक्षणाची स्थिती मांडणारे सर्वेक्षण एन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) नुकतेच समोर आले. यातील निरीक्षणे गंभीर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालावली असल्याचे त्यातून दिसून येते. विशेषतः आपल्या मातृभाषेतील सोपा परिच्छेद आठवीतील अनेक विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. सोपी गणिते सोडविता येत नाहीत, अशा अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. या पार्श्वभूमीवर आपण नेमके कोठे चुकतो आहोत, ही स्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, शाळा, शिक्षक व पालक यांनी या समस्येवर कसा मार्ग काढायला हवा, विशेषतः पालकवर्गाने आता जागे व्हावे म्हणजे नमके काय करावे याची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आहे, पुण्यातील अभिनव शाळेच्या विद्यार्थीप्रिय अशा माजी मुख्याध्यापिका व प्रयोगशील मार्गदर्शक विद्याताई साताळकर यांना. विद्याताईंनी आजवर राबवलेल्या उपक्रमांतून आणि त्यातून आलेल्या अनुभवांच्या आधारे या विषयाकडे पालकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे यावर सुस्पष्ट भाष्य केले आहे. प्रत्येक सजग पालकाने ऐकायलाच हवा आणि सजग नसलेल्या पालकाला सजग करायला लावणारा असा हा खास पॉडकास्ट जरुर ऐका आणि जास्तीत जास्त पालक, शिक्षक अन् विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा...मुलांचे भवितव्य बदलण्यासाठी एवढे तर करावेच लागेल..पालकहो, आता जागे व्हावे लागेल!

Duration:00:36:00

Ask host to enable sharing for playback control

ओमी वैद्य `आईच्या गावात मराठीत बोल`तो तेव्हा...

1/12/2024
`3 इडियटस्` चित्रपटामधील `चतुर` या पात्रातून घरोघरी पोहोचलेला अमेरिकास्थित अभिनेता ओमी वैद्य मराठीमध्ये चित्रपट घेऊन येतो, ही बातमीच तशी अतिशय वेगळी. अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या मात्र मराठीशी नाळ कायम ठेऊ पाहणाऱ्या ओमीला मराठीत अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांतून पुढे यावंसं वाटलं तेव्हा काय घडलं, हा अतिशय आगळा अनुभव ठरला. या चित्रपटाचे कथानक ज्यांच्या शब्दांतून फुलले त्या अमेरिकास्थित लेखिका अमृता हर्डीकर यांनाही यानिमित्ताने आपल्या मायबोलीत प्रेक्षकांपुढे येण्याची संधी नव्याने लाभली. ओमी आणि अमृताने हे शिवधनुष्य कसे पेलले? विशेष म्हणजे, या चित्रपटात `स्टोरीटेल`नेही भूमिका बजावली आहे, ती नेमकी काय आहे...अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टींची उलगड करणारा स्टोरीटेल कट्ट्याचा हा स्पेशल पॉडकास्ट प्रत्येकाने आवर्जून ऐकावा. `आईच्या गावात..मराठीत बोल` या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेला हा संवाद पडद्यावर दिसणाऱ्या कलाकृतीमागच्या दडलेल्या अनेक कथाही नकळत सांगून जातो, असे हे स्टोरीटेलिंग, ऐकायला विसरु नका!

Duration:01:01:06

Ask host to enable sharing for playback control

झलक- पेटलेलं मोरपीस 03

1/7/2024
विषय अत्यंत दाहक... स्टोरीटेल वर प्रचंड गाजलेल्या 'पेटलेले मोरपीस' या मालिकेचा तिसरा सिझन तितकाच जबरदस्त हीट झाला. 'त्या' आणि 'तशा' विषय मुक्तपणे भाष्य करणार्‍या एका 'क्रांतिकारी' कथानकाची ही छोटी झलक! शब्द: नितीन थोरात, आवाज: उर्मिला निंबाळकर संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी क्लिक करा- https://storytel.com/in/en/books/petlela-morpis-se03e01-2531061?appRedirect=true

Duration:00:51:55