Life of Stories-logo

Life of Stories

Kids & Family Podcasts

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Location:

India

Description:

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Language:

English


Episodes
Ask host to enable sharing for playback control

# 1487: आठवण. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/31/2024
"आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास देतो" आईचा आवाज कानात घुमायला लागला. ." पुलवाचे एक छोटे पॅकेट त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले.

Duration:00:05:30

Ask host to enable sharing for playback control

# 1486: वाळू निसटून जाताना. लेखिका स्वाती पाटील. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/31/2024
वयाच्या साठाव्या वर्षी तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुर्ण करायला पुन्हा पाण्यात उतरली. दररोज आठ, दहा, बारा, चौदा तास ती पोहण्याचा सराव करत राहिली. हळू हळू ती सलग 24 तास पाण्यात पोहू लागली. ॲथलीट डायना न्याड वयाच्या 64 व्या वर्षी क्यूबा ते फ्लोरिडा हा 180 किलोमीटर चा खुला समुद्र 5 अयशस्वी प्रयत्नानंतर यशस्वीपणे पोहुन गेली. तिचा जीवन प्रवास Nyad ह्या सिनेमात चित्रबद्ध केला आहे. ही मूव्ही Netflix वर उपलब्ध आहे.

Duration:00:09:08

Ask host to enable sharing for playback control

# 1485: संथ वाहते कृष्णामाई. लेखिका : मानसी देशपांडे. कथन : ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/30/2024
काही गाणी ही अशी असतात की ती ऐकली तरी अंगावर शहारे येतात. माणसाच्या आयुष्यात अनेक संकटं येतात, काही प्रसंग तर असे येतात की त्या मध्ये आपली अक्षरशः कसोटी लागते. पण अशा वेळी आपण ते बोलून, भांडून व्यक्त करु शकतो . नदी मात्र अनेक गोष्टी तिच्या पोटात साठलेल्या असूनही शांतपणे वाहतच असते.

Duration:00:06:38

Ask host to enable sharing for playback control

# 1484: प्रत्येकाच्या आयुष्याची पटकथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/27/2024
आपले शरीर असंख्य पेशींचे. प्रत्येक पेशीत आईकडून मिळालेली २३ आणि वडिलांकडून मिळालेली २३ अशी ४६ गुणसूत्रे. ती असतात केंद्रकात (nucleus). या केंद्रकातूनच पेशीतील सर्व व्यवहारांवर क्षणोक्षणी नियंत्रण ठेवले जाते. या पेशीकेंद्रकात गुणसूत्रांची वस्ती असते. पेशी विभाजनाच्या वेळीच ही गुणसूत्रे ‘एक्स’ आकाराच्या स्वरूपात दिसतात. इतरवेळी या गुणसूत्रांचे लांबलचक धागे होऊन शेवयांसारखे पेशीत विराजमान असतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएच्या लांबच लांब धाग्याने बनलेले असते. माणसाच्या एका पेशीतील डीएनएचे सर्व धागे एकापुढे एक ठेवून त्यांची लांबी मोजली तर ती २.२ मीटर भरते.

Duration:00:08:38

Ask host to enable sharing for playback control

# 1483: तुपाची धार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/26/2024
मी सगळं वाढल्यावर त्यांना विचारलं भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता ...मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसल नव्हत ..मी म्हणाले काकू हे दूध आहे तूप नाही.. त्यांनी हळू आवाजात मला सांगितलं तूप नाही..! संपले आहे ! दुधाचा एक एक चमचा भातावर वाढ म्हणजे ती मंडळी जेवायला बसतील.

Duration:00:03:54

Ask host to enable sharing for playback control

# 1482: God particles चा जनक पीटर हिग्ज. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/25/2024
सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना त्यांचे वस्तुमान कसे प्राप्त होते, हा प्रश्न हिग्ज यांना सारखा छळत होता. त्यातूनच त्यांनी तोवर ज्ञात असलेल्या मूलकणांशिवाय वेगळे असे मूलकण अस्तित्वात असले पाहिजे, असा सिद्धांत मांडला. हा मूलकण शोधण्यासाठी “लार्ज हॅड्रॉन कोलायडर”सारखा अब्जावधी डॉलरचा महाप्रयोग हजारो शास्त्रज्ञांनी काही दशके काळजीपूर्वक तयारी करून उभा केला. आणि याचे फलित म्हणून मूलकणांच्या सर्वमान्य सिद्धांतावर शिक्कामोर्तब झाले. हिग्ज यांच्या सिद्धांतातील त्या कणांचे त्यांच्या आणि सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावांवरून हिग्ज बोसॉन असे नामकरण करण्यात आले. पुढे त्या कणांना देव कण असे लोकप्रिय नाव लाभले.

Duration:00:05:52

Ask host to enable sharing for playback control

# 1481: फ्रामजी कावसजी बानाजी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/24/2024
फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात ती करंडी नेऊन ठेवली. ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते. १८ में १८३८ साली भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले, अस म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागली होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली.

Duration:00:07:45

Ask host to enable sharing for playback control

# 1480: लक्षद्वीप वरील प्रवाळ भिंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/23/2024
अशी प्रवाळ बेटे समुद्रातील जीवांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. भारतात प्रवाळाची बेटे ही कोकणात तारकर्ली, गुजरातमधे द्वारकेजवळ, तसेच लक्षद्वीप येथे व अन्यत्र फ्लोरिडा, वेस्ट इंडीज, आफ्रिकेचा दक्षिण किनारा, स्पेन आणि मालदीव येथे आढळतात असे समजते. याखेरीज भूमध्यसमुद्रातही असे प्रवाळ आढळते. जगातील काही ठिकाणच्या प्रवाळबेटांना अलीकडच्या काळात हानी पोचली आहे असे दिसून आले आहे.

Duration:00:07:59

Ask host to enable sharing for playback control

# 1479: turning pain into power. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/22/2024
आफ्रिकेतल्या काँगो या देशातल्या इतिहासातील एका अत्यंत दुखऱ्या पानाची गोष्ट आहे ही. काँगोमधल्या लेमेरा हाॅस्पिटल मधे छिन्न विछिन्न अवस्थेतल्या बायका रुग्ण म्हणून येऊ लागल्या. उग्र अत्याचाराचे ते भेसूर भयानक रूप पाहून डॉक्टर हादरून गेले. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुटपुंज्या साधनसामुग्री मधे त्या बायकांना वाचवले. बोलते केले.

Duration:00:07:36

Ask host to enable sharing for playback control

# 1478: महाभारत युद्धातील किचन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/21/2024
प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल, म्हणूनच आज उडुपीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हातांनी बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे.

Duration:00:08:39

Ask host to enable sharing for playback control

# 1477: झाडाझडती...!! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/20/2024
आणि हे काय.. नवा कोरा पण ठेवून ठेवून जुनकट झालेला ड्रेस.. आवडला म्हणून घेतला पण घट्ट होत होता. परत देऊन बदलून न आणता वजन कमी करून मग घालावा असा विचार केला.. म्हटलं, चला.. वजन कमी करण्यासाठी चांगलं कारण मिळालंय.. अजूनही तो ड्रेस काही घालता आला नाही.. पण ‘आशा अमर असते‘ असं म्हणतात ना..!!

Duration:00:07:14

Ask host to enable sharing for playback control

# 1476: सत्याच्या वेशातले मिथ्य. लेखक : डॉ. कैलास दौंड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/17/2024
म्हातारीच्या मेलेल्या नातवाने परतून जरी तिचा विश्वास संपादित केला तरी बिंग फुटण्याच्या भयाने त्याने पोबारा केला. रेटून बोललेले खोटे कधी कधी खऱ्यालाही संभ्रमित करते. पण त्या असत्याला ही सत्य प्रगटण्याची कायम भीती असते.

Duration:00:07:30

Ask host to enable sharing for playback control

# 1475: फुले फळे नसणारी झाडे. लेखक : प्रा. वैभवीराम किन्हीकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/17/2024
जुन्याकाळी एकत्र कुटुंबांमध्ये एखादा ब्रम्हचारी किंवा मुलेबाळे नसलेला विधूर काका, मामा, एखादी बालविधवा किंवा , मुलेबाळे नसलेली आत्या, मामी वगैरे.असायची. तत्कालीन एकत्र कुटुंबात त्यांचा सांभाळ व्हायचा. घरात पडेल ते काम करुन आपली उपयुक्तता पटवून देण्याची कमाल कोशिष करणार्‍या ह्या व्यक्ती. आजच्या व्यावहारिक जगात ही फुले फळे नसलेली झाडेच.

Duration:00:06:22

Ask host to enable sharing for playback control

# 1474: चैत्रांगण.. लेखिका सौ. सुजाता लेले. कथन : ( मीनल भडसावळे )

5/14/2024
सदर गोष्ट चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी हिंदु धर्मात घरोघरी काढण्यात येणार्‍या चैत्रांगणाची आहे. तसेच पाने, फुले, फळे, देवदेवता वगैरेंची चित्रे, चिन्हे यांची अंगणात रांगोळी काढून रंगवून त्याबरोबर निसर्ग- देवतेची आराधना करून स्वागत करण्याची आहे.

Duration:00:04:48

Ask host to enable sharing for playback control

# 1473: नागो बुढ्याला कर्जमाफी. लेखक : तंबी दुराई. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/14/2024
" बुढा बँकेच्या कर्जमाफी आधिकाऱ्याला म्हणाला, "आवो साहेब, म्या आधीचे 22 बी घेतले नवते आणि हे पंधरा बी घेतले न्हाईत . म्या शामराव सावकार कडून कर्ज घेतलं ह्या वर्षाला. आता तुला जमत असेल तर सावकार कडून घेतलेले कर्ज माफ करुन दे. त्याचा माणूस रोज येतो माझ्याकडे!"

Duration:00:08:07

Ask host to enable sharing for playback control

# 1472: कवितेचे नाव : बहावा. कवयित्री : इंदिरा संत. वाचन : ( सौ.मधुरा कुळकर्णी.)

5/12/2024
मनाला आनंद देणारं विसाव्याचं ठिकाण म्हणजे निसर्ग! याच निसर्गाने दिलेली अनोखी भेट म्हणजे बहावा!..

Duration:00:04:38

Ask host to enable sharing for playback control

# 1471: पंख छाटलेली सुशी. लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/11/2024
एसटीत बसल्या बसल्या गावातल्या अनेक मुली डोळ्यासमोर येत होत्या. आडदांड बांध्याची निर्मी कुठे बरं गेली? तिचं लग्न झालं एवढं कळलं. 14 वर्षांची घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची दिग्या काकांची ‘राघी‘... चांगली शिकत होती . पण एका मुलाने तिला पत्र लिहिलं आणि रातोरात काकांनी तिचे लग्न लावून दिलं. गावातल्या अशा कित्येक झाले अचानक बेपत्ता झाल्या होत्या.

Duration:00:06:23

Ask host to enable sharing for playback control

# 1470: अंटार्टिकाच्या 72 वर्षीय मॅरेथॉनरचा इंटरव्ह्यू : श्री. सतीश कोल्ढेकर. मुलाखतकार: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

5/10/2024
श्री सतीश कोल्ढेकर यांनी जगातील सात खंडांपैकी 6 खंडांमध्ये मॅरेथॉन धावून यश संपादन केले आहे. 22 जानेवारी 2024 मधे 72 व्या वर्षी यांनी अंटार्टिका किंवा दक्षिण ध्रुवावर धावून मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. अशा बहादुराशी मारलेल्या गप्पा आपल्याशी शेयर करीत आहे. जरूर ऐका...

Duration:00:16:52

Ask host to enable sharing for playback control

# 1469: मधुमालती आणि प्राजक्त. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/9/2024
मी नातवंडांना हाक मारली - 'शुभा, शार्दुल, शर्व... खाली या. मधुमालतीचा बहर बघा. तिचा वास घ्या. तिला स्पर्श करा... आनंदी व्हा. पारिजातकाचा सडा पहा... फुलं वेचा अन् त्यांचा सुगंध भरभरून अनुभवा... मी नसेन तेंव्हा .... मी या मधुमालतीत असेन, या प्रजक्तात असेन..‘ आणि प्रतिभेनं एक वेगळं वळण घेतलं ... मधुमालती अन् प्राजक्त पुरते भिनले मनात.. हा अनुभव प्रत्येकानी घ्यायलाच हवा..!!

Duration:00:07:04

Ask host to enable sharing for playback control

# 1468: आजी - आजोबा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/8/2024
मी या म्हाताऱ्या बाईबरोबर शाळेत जाणार नाही... आपल्या दहा वर्षांच्या मुलाचे, सार्थकचे शब्द ऐकून संध्या स्तब्ध झाली. तो काय म्हणतो ? तो आपल्या आजीला म्हातारी का म्हणतोय ? हा असा उद्धटपणा तो कुठून शिकला असेल ? संध्या विचारात पडली…

Duration:00:03:58