Life of Stories-logo

Life of Stories

Kids & Family Podcasts

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Location:

India

Description:

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Language:

English


Episodes
Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

Love you all. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

6/11/2024
लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला, “हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !” त्यावर पाटिल बाई उत्तरल्या, 'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं, की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' !

Duración:00:08:06

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1497: चिखल पळवणारी टोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

6/10/2024
त्यांची टोळी ही साधी सुधी नसते. चांगले दोन अडिचशे टोळीचे सदस्य एकाचवेळी कल्ला करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटुन पडलेले दिसतात. चिमणीच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्षांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. हा पक्षी चिखलापासून आपलं घरटं बनवतो. यासाठी चिखल जमण्यासाठी समूहाने आरडून एकच कल्ला करत पाणवठ्यावर जमतो. त्याचे चिखल चोचीत जमवतानाचे दृष्य एखाद्या मोठ्या टोळीने एकत्र जमून हल्लाबोल उडवून द्यावा असं असतं.

Duración:00:06:30

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1496: भेट पांडुरंगाची. लेखिका नीता चं कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

6/9/2024
मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला . सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं काहीही न ल्यायलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात नीट बघितले की दिसतात...

Duración:00:05:18

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1495: लोभाने आंधळा झालेल्याची गोष्ट. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

6/8/2024
दुसऱ्या दिवशी त्याने चौथा दिवा लावला आणि घाईघाईने उत्तरेकडे निघाला. दिवा विझला. आणि त्याला कळले की हा महाल फक्त त्याच्यासाठी आहे. "नाही, गिरणी बंद करू नकोस." म्हातारा म्हणाला, "हा राजवाडा आता तुझा आहे. पण जोपर्यंत तू गिरणी चालवत आहेस तोपर्यंतच हा राजवाडा उभा राहील. गिरणी बंद पडली तर तो कोसळेल आणि तू सुद्धा त्याखाली मरशील" . म्हातारा पुन्हा म्हणाला, "तुझ्यासारखं मीही लोभापोटी साधूचे ऐकले नाही आणि माझे संपूर्ण तारुण्य ही गिरणी चालवण्यात घालवले."

Duración:00:06:37

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1494: डोंगरगावची पाणीबाणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

6/7/2024
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला. ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला, "'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही. एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा. पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग....!!‘

Duración:00:07:48

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1493: काश्यप ऋषींचे काश्मीर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

6/6/2024
दुसऱ्या दिवशी, शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले. शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन मंत्रित करून लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.

Duración:00:09:40

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1492: "ते तर मला येतय्". लेखक : डॉ. कैलास दौंड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

6/5/2024
येत नाही हे कबूल करण्या ऐवजी "ते तर मला येतय्" असा धोषा लावला की अशी फजिती होते ....!

Duración:00:05:46

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1491: तसबीर तेरी दिलमे . लेखक श्री. संभाजी गायके.कथन: ( मीनल भडसावळे )

6/4/2024
ही गोष्ट स्वीडनची राजकन्या आणी एका महान कलाकाराच्या प्रेमाची आहे. फार खडतर प्रवास करून त्याने स्वीडन ह्या देशात पोचण्याची आहे. शार्लटची चारूलता होण्याची आहे.

Duración:00:05:19

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1490: नि:शब्द पान्हा. . कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

6/3/2024
"दिस उजाडला की हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत. घरात पोटभर खायला नाय. घाम फुटतो पण पान्हा फुटना. तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू ?" औषध नक्की कुणाला देऊ ? ज्याला भूक लागलीय म्हणून तो रडतोय त्या बाळाला, की दुध येत नाही म्हणून आईला ? की परिस्थितीला ?

Duración:00:07:34

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

#1489: रामरक्षा नाही तर नुसती बाराखडी म्हण". लेखिका निता च. कुलकर्णी. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

6/2/2024
सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं . डॉक्टर म्हणाले,, घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो . प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम..."

Duración:00:06:50

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1488: सत्पात्री दान! लेखक : अज्ञात. वाचन : (सौ.मधुरा कुळकर्णी. )

6/1/2024
वृथा दानं समर्थस्य | म्हणजेच एखाद्या श्रीमंताच्या मुलाला वह्या पुस्तकांचे दान करणे . दान हे नेहमी सत्पात्री असावं

Duración:00:05:32

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1487: आठवण. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/31/2024
"आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास देतो" आईचा आवाज कानात घुमायला लागला. ." पुलवाचे एक छोटे पॅकेट त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले.

Duración:00:05:30

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1486: वाळू निसटून जाताना. लेखिका स्वाती पाटील. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/31/2024
वयाच्याhttps://open.spotify.com/episode/3KqGWUrhbKoEVI7rdRZR03?si=Z9AEAsRQSr27p8pIWipd9Q साठाव्या वर्षी तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुर्ण करायला पुन्हा पाण्यात उतरली. दररोज आठ, दहा, बारा, चौदा तास ती पोहण्याचा सराव करत राहिली. हळू हळू ती सलग 24 तास पाण्यात पोहू लागली. ॲथलीट डायना न्याड वयाच्या 64 व्या वर्षी क्यूबा ते फ्लोरिडा हा 180 किलोमीटर चा खुला समुद्र 5 अयशस्वी प्रयत्नानंतर यशस्वीपणे पोहुन गेली. तिचा जीवन प्रवास Nyad ह्या सिनेमात चित्रबद्ध केला आहे. ही मूव्ही Netflix वर उपलब्ध आहे.

Duración:00:09:08

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1485: संथ वाहते कृष्णामाई. लेखिका : मानसी देशपांडे. कथन : ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/30/2024
काही गाणी ही अशी असतात की ती ऐकली तरी अंगावर शहारे येतात. माणसाच्या आयुष्यात अनेक संकटं येतात, काही प्रसंग तर असे येतात की त्या मध्ये आपली अक्षरशः कसोटी लागते. पण अशा वेळी आपण ते बोलून, भांडून व्यक्त करु शकतो . नदी मात्र अनेक गोष्टी तिच्या पोटात साठलेल्या असूनही शांतपणे वाहतच असते.

Duración:00:06:38

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1484: प्रत्येकाच्या आयुष्याची पटकथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/27/2024
आपले शरीर असंख्य पेशींचे. प्रत्येक पेशीत आईकडून मिळालेली २३ आणि वडिलांकडून मिळालेली २३ अशी ४६ गुणसूत्रे. ती असतात केंद्रकात (nucleus). या केंद्रकातूनच पेशीतील सर्व व्यवहारांवर क्षणोक्षणी नियंत्रण ठेवले जाते. या पेशीकेंद्रकात गुणसूत्रांची वस्ती असते. पेशी विभाजनाच्या वेळीच ही गुणसूत्रे ‘एक्स’ आकाराच्या स्वरूपात दिसतात. इतरवेळी या गुणसूत्रांचे लांबलचक धागे होऊन शेवयांसारखे पेशीत विराजमान असतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएच्या लांबच लांब धाग्याने बनलेले असते. माणसाच्या एका पेशीतील डीएनएचे सर्व धागे एकापुढे एक ठेवून त्यांची लांबी मोजली तर ती २.२ मीटर भरते.

Duración:00:08:38

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1483: तुपाची धार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/26/2024
मी सगळं वाढल्यावर त्यांना विचारलं भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता ...मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसल नव्हत ..मी म्हणाले काकू हे दूध आहे तूप नाही.. त्यांनी हळू आवाजात मला सांगितलं तूप नाही..! संपले आहे ! दुधाचा एक एक चमचा भातावर वाढ म्हणजे ती मंडळी जेवायला बसतील.

Duración:00:03:54

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1482: God particles चा जनक पीटर हिग्ज. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/25/2024
सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना त्यांचे वस्तुमान कसे प्राप्त होते, हा प्रश्न हिग्ज यांना सारखा छळत होता. त्यातूनच त्यांनी तोवर ज्ञात असलेल्या मूलकणांशिवाय वेगळे असे मूलकण अस्तित्वात असले पाहिजे, असा सिद्धांत मांडला. हा मूलकण शोधण्यासाठी “लार्ज हॅड्रॉन कोलायडर”सारखा अब्जावधी डॉलरचा महाप्रयोग हजारो शास्त्रज्ञांनी काही दशके काळजीपूर्वक तयारी करून उभा केला. आणि याचे फलित म्हणून मूलकणांच्या सर्वमान्य सिद्धांतावर शिक्कामोर्तब झाले. हिग्ज यांच्या सिद्धांतातील त्या कणांचे त्यांच्या आणि सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावांवरून हिग्ज बोसॉन असे नामकरण करण्यात आले. पुढे त्या कणांना देव कण असे लोकप्रिय नाव लाभले.

Duración:00:05:52

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1481: फ्रामजी कावसजी बानाजी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/24/2024
फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात ती करंडी नेऊन ठेवली. ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते. १८ में १८३८ साली भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले, अस म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागली होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली.

Duración:00:07:45

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1480: लक्षद्वीप वरील प्रवाळ भिंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/23/2024
अशी प्रवाळ बेटे समुद्रातील जीवांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. भारतात प्रवाळाची बेटे ही कोकणात तारकर्ली, गुजरातमधे द्वारकेजवळ, तसेच लक्षद्वीप येथे व अन्यत्र फ्लोरिडा, वेस्ट इंडीज, आफ्रिकेचा दक्षिण किनारा, स्पेन आणि मालदीव येथे आढळतात असे समजते. याखेरीज भूमध्यसमुद्रातही असे प्रवाळ आढळते. जगातील काही ठिकाणच्या प्रवाळबेटांना अलीकडच्या काळात हानी पोचली आहे असे दिसून आले आहे.

Duración:00:07:59

Pídele al anfitrión que permita compartir el control de reproducción

# 1479: turning pain into power. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/22/2024
आफ्रिकेतल्या काँगो या देशातल्या इतिहासातील एका अत्यंत दुखऱ्या पानाची गोष्ट आहे ही. काँगोमधल्या लेमेरा हाॅस्पिटल मधे छिन्न विछिन्न अवस्थेतल्या बायका रुग्ण म्हणून येऊ लागल्या. उग्र अत्याचाराचे ते भेसूर भयानक रूप पाहून डॉक्टर हादरून गेले. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुटपुंज्या साधनसामुग्री मधे त्या बायकांना वाचवले. बोलते केले.

Duración:00:07:36