Life of Stories-logo

Life of Stories

Kids & Family Podcasts

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Location:

India

Description:

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Language:

English


Episodes
Ask host to enable sharing for playback control

# 1476: सत्याच्या वेशातले मिथ्य. लेखक : डॉ. कैलास दौंड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/17/2024
म्हातारीच्या मेलेल्या नातवाने परतून जरी तिचा विश्वास संपादित केला तरी बिंग फुटण्याच्या भयाने त्याने पोबारा केला. रेटून बोललेले खोटे कधी कधी खऱ्यालाही संभ्रमित करते. पण त्या असत्याला ही सत्य प्रगटण्याची कायम भीती असते.

Duration:00:07:30

Ask host to enable sharing for playback control

# 1475: फुले फळे नसणारी झाडे. लेखक : प्रा. वैभवीराम किन्हीकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/17/2024
जुन्याकाळी एकत्र कुटुंबांमध्ये एखादा ब्रम्हचारी किंवा मुलेबाळे नसलेला विधूर काका, मामा, एखादी बालविधवा किंवा , मुलेबाळे नसलेली आत्या, मामी वगैरे.असायची. तत्कालीन एकत्र कुटुंबात त्यांचा सांभाळ व्हायचा. घरात पडेल ते काम करुन आपली उपयुक्तता पटवून देण्याची कमाल कोशिष करणार्‍या ह्या व्यक्ती. आजच्या व्यावहारिक जगात ही फुले फळे नसलेली झाडेच.

Duration:00:06:22

Ask host to enable sharing for playback control

# 1474: चैत्रांगण.. लेखिका सौ. सुजाता लेले. कथन : (मीनल भडसावळे )

5/14/2024
सदर गोष्ट चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी हिंदु धर्मात घरोघरी काढण्यात येणार्‍या चैत्रांगणाची आहे. तसेच पाने, फुले, फळे, देवदेवता वगैरेंची चित्रे, चिन्हे यांची अंगणात रांगोळी काढून रंगवून त्याबरोबर निसर्ग- देवतेची आराधना करून स्वागत करण्याची आहे.

Duration:00:04:48

Ask host to enable sharing for playback control

# 1473: नागो बुढ्याला कर्जमाफी. लेखक : तंबी दुराई. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/14/2024
"नागो बुढा बँकेच्या कर्जमाफी आधिकाऱ्याला म्हणाला, "आवो साहेब, म्या आधीचे 22 बी घेतले नवते आणि हे पंधरा बी घेतले न्हाईत . म्या शामराव सावकार कडून कर्ज घेतलं ह्या वर्षाला. आता तुला जमत असेल तर सावकार कडून घेतलेले कर्ज माफ करुन दे. त्याचा माणूस रोज येतो माझ्याकडे!"

Duration:00:08:07

Ask host to enable sharing for playback control

# 1472: कवितेचे नाव : बहावा. कवयित्री : इंदिरा संत. वाचन : (सौ.मधुरा कुळकर्णी.)

5/12/2024
मनाला आनंद देणारं विसाव्याचं ठिकाण म्हणजे निसर्ग! याच निसर्गाने दिलेली अनोखी भेट म्हणजे बहावा!..

Duration:00:04:38

Ask host to enable sharing for playback control

# 1471: पंख छाटलेली सुशी. लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/11/2024
एसटीत बसल्या बसल्या गावातल्या अनेक मुली डोळ्यासमोर येत होत्या. आडदांड बांध्याची निर्मी कुठे बरं गेली? तिचं लग्न झालं एवढं कळलं. 14 वर्षांची घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची दिग्या काकांची ‘राघी‘... चांगली शिकत होती . पण एका मुलाने तिला पत्र लिहिलं आणि रातोरात काकांनी तिचे लग्न लावून दिलं. गावातल्या अशा कित्येक झाले अचानक बेपत्ता झाल्या होत्या.

Duration:00:06:23

Ask host to enable sharing for playback control

# 1470: अंटार्टिकाच्या 72 वर्षीय मॅरेथॉनरचा इंटरव्ह्यू : श्री. सतीश कोल्ढेकर. मुलाखतकार: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

5/10/2024
श्री सतीश कोल्ढेकर यांनी जगातील सात खंडांपैकी 6 खंडांमध्ये मॅरेथॉन धावून यश संपादन केले आहे. 22 जानेवारी 2024 मधे 72 व्या वर्षी यांनी अंटार्टिका किंवा दक्षिण ध्रुवावर धावून मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. अशा बहादुराशी मारलेल्या गप्पा आपल्याशी शेयर करीत आहे. जरूर ऐका...

Duration:00:16:52

Ask host to enable sharing for playback control

# 1469: मधुमालती आणि प्राजक्त. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/9/2024
मी नातवंडांना हाक मारली - 'शुभा, शार्दुल, शर्व... खाली या. मधुमालतीचा बहर बघा. तिचा वास घ्या. तिला स्पर्श करा... आनंदी व्हा. पारिजातकाचा सडा पहा... फुलं वेचा अन् त्यांचा सुगंध भरभरून अनुभवा... मी नसेन तेंव्हा .... मी या मधुमालतीत असेन, या प्रजक्तात असेन..‘ आणि प्रतिभेनं एक वेगळं वळण घेतलं ... मधुमालती अन् प्राजक्त पुरते भिनले मनात.. हा अनुभव प्रत्येकानी घ्यायलाच हवा..!!

Duration:00:07:04

Ask host to enable sharing for playback control

# 1468: आजी - आजोबा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/8/2024
मी या म्हाताऱ्या बाईबरोबर शाळेत जाणार नाही... आपल्या दहा वर्षांच्या मुलाचे, सार्थकचे शब्द ऐकून संध्या स्तब्ध झाली. तो काय म्हणतो ? तो आपल्या आजीला म्हातारी का म्हणतोय ? हा असा उद्धटपणा तो कुठून शिकला असेल ? संध्या विचारात पडली…

Duration:00:03:58

Ask host to enable sharing for playback control

# 1467: एका साध्वी चे जीवन. लेखक: न्या. राम केशव रानडे. कथन : ( सौ.मधुरा कुळकर्णी.)

5/7/2024
माधवराव पेशवे व रमाबाई यांचं एकमेकाच्या विश्वासावर आधारित अतूट असं नातं होतं . माधवराव आजारी असतानाचा एक ह्रदयद्रावक काळजाला भिडणारा असा प्रसंग...

Duration:00:04:45

Ask host to enable sharing for playback control

# 1466: नसलेल्या जमिनीचा शोध लेखक. : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/6/2024
कमी कष्टात श्रीमंत होण्यासाठी एका शहरी तरुणाने 'गाव कडच्या नसलेल्या जमिनीचा शोध ' घेण्यासाठी केलेल्या उठाठेवीची कहाणी !

Duration:00:06:02

Ask host to enable sharing for playback control

#1466: झाडांची भिशी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

5/5/2024
लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात.

Duration:00:05:28

Ask host to enable sharing for playback control

# 1465: जगातील सर्वात श्रीमंत माणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/4/2024
मी त्याला विचारले," तु मला ओळखतोस का ? तो म्हणाला," हो तुम्ही बिल् गेट्स आहात...! मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस...!* तो म्हणाला, "हो...दोनदा...!" मी म्हणालो, " मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग...! मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो...!!! यावर तो नम्रपणे म्हणाला, " सर पण तुम्हाला असं वाटत नाही का, कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही...!"

Duration:00:03:58

Ask host to enable sharing for playback control

# 1464: पेनची नळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/3/2024
माझ्या प्रश्नाने बंड्या गांगरला ... मी परत विचारलं "इथं इतके लोक आहेत, मग माझ्याकडेच नळी का मागितली.?" बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून .!!!" मग मी सगळीकडे बघितलं ...बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ... बंड्याचे निरीक्षण अचूक होते ... माझ्या खिशाला माझं आवडतं पेन होतं.

Duration:00:04:39

Ask host to enable sharing for playback control

# 1463: डिफॅाल्ट मोड. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

5/2/2024
आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!

Duration:00:06:38

Ask host to enable sharing for playback control

# 1462: 20 हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीत पाठवणार! लेखक : भावेश ब्राह्मणकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/1/2024
जगभरात सध्या एका धमकीची चर्चा आहे. ती म्हणजे, जर्मनीत वीस हजार हत्तींचा कळप सोडून देण्याची. बोत्सवाना मध्ये 1 लाख 30 हजारांहून अधिक हत्ती झाल्याने अनेक समस्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी शिकारी पर्यटक जर्मनीला ही धमकी दिली.

Duration:00:06:26

Ask host to enable sharing for playback control

# 1461: मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. लेखक : डॉ. श्रीरंजन आवटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

5/1/2024
स्वातंत्र्य हवं तर आपलं मन मुक्त हवं, हे सांगणार हे रूपक . एकदा हा आनंद गवसला की मोराच्या अस्तित्वाशिवाय नाचता येतं . स्वातंत्र्याचे अस्तित्व असे अटींच्या पलीकडे असू शकते .

Duration:00:04:42

Ask host to enable sharing for playback control

# 1460: कॅलेंडर. (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

4/29/2024
मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरुन घेणार्‍या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्रर्र झालं. पुढल्या तीनच दिवसांत... म्हणजे १८ जुलै २०२० ला, त्याचे बाबा गेले होते. आणि कॅलेंडरवरच्या १८ तारखेला होतं, एक मोठ्ठं काळा टिंब... अर्थातच फुलस्टॅाप. "म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच, आपल्या आईचं आयुष्यही थांबलं?... तिला आता फरकच पडेनासा झालाय की, आज काय तारीख आहे?... इतकी रिकामी झालीये ती अंतरातून, ह्या कॅलेंडर्स सारखीच?"

Duration:00:08:08

Ask host to enable sharing for playback control

# 1459: शोधा आपला आवडता झेंडा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

4/28/2024
माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले. ‘आता या बिग मॅन एरिकने स्मॉल किड एरीकचे स्वप्न पूर्ण करायचे‘.. आणि दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे.." एरीक मस्त छोट्या एरीकसारखा, निरागस हसला.. आणि मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.. पार्टी संपली..

Duration:00:06:01

Ask host to enable sharing for playback control

# 1458: प्रेमाने जग जिंका (डॅा. सौ. आरती जुवेकर.)

4/27/2024
हे विलक्षण दृश्य पाहून सापाचे मन आपुलकीने भरून आले. चांगली वागणूक, नम्रता आणि गोडवा या जादूने त्याला मंत्रमुग्ध केलं होतं. तो राजाला मारण्यासाठी निघाला होता, पण आता त्याचं कार्य त्याच्यासाठीच अशक्य झाले होते. शत्रूला हानी पोहोचवायला आलेल्या शत्रूशी मैत्रीपूर्ण वागणूक असलेल्या त्या धर्मनिष्ठ राजाला मी कसं मारू? या प्रश्नामुळे तो कोंडीत सापडला.

Duration:00:04:21